जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

IND vs ENG 4th Test 2021: तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) एकतर्फी कामगिरीनंतर टीम इंडिया (Team India0 चौथ्या कसोटी सामन्यात आणखी एका विजयाच्या उद्देशाने अहमदाबादच्या नवनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरेल. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या सामन्यापूर्वी संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) संघातून रिलीज करण्यात आले आहे. बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे रजा देण्यात आली आहे ज्यामुळे कर्णधार विराट कोहली अंतिम सामन्यात काही नवीन जोड्यांचा प्रयत्न करू शकेल. बरेच गोलंदाज स्पर्धेत उतरण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि बुमराहसारख्या गोलंदाजाची अनुपस्थिती भरून काढणे नक्कीच कठीण काम आहे. भारतीय संघात (Indian Team) असे अनेक गोलंदाज आहेत जे त्याची जागा घेण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत, पण ते कोणास संधी देऊ इच्छितात हे व्यवस्थापनावर अवलंबून आहे. (IND vs ENG 4th Test 2021: चौथ्या टेस्टसाठी अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत Rohit Sharma यालाही पडला प्रश्न, शेअर केली मजेदार पोस्ट)

चौथ्या अहमदाबाद सामन्यासाठी फिरकी गोलंदाजासह जात असल्यास कुलदीप यादव त्यांची पहिली निवड होऊ शकतो. पण जर ते वेगवान गोलंदाज शोधत असतील तर तिथेही काही पर्याय उपलब्ध आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

1. कुलदीप यादव

यादव भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू ठरला आहे. तथापि, एकाधिक परदेश दौर्‍यामुळे, त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. शिवाय, आधुनिक काळातील दिग्गज रवी अश्विनच्या उदयानंतर व्यवस्थापनाला यादवची एवढी आवश्यकता भासली नाही. त्यामुळे कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला 2 वर्षांहून अधिक काळ थांबावे लागले. आणि बुमराह उपस्थित नसल्याने चौथ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळू शकते. जर व्यवस्थापनाला एखाद्याने अक्षर आणि अश्विनला मदत करण्याची गरज भासली असेल तर यादव योग्य निवड असेल. शिवाय, यादव खालच्या फळीत फलंदाजीसाठी वाईट खेळाडूही नाही. त्याने खेळलेल्या सात सामन्यांत त्याची सर्वाधिक धावसंख्या 26 आहे.कुलदीप कर्णधारासाठीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो. म्हणूनच, तो प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहची जागा घेऊ शकेल!

2. उमेश यादव

उमेश यादव कसोटी प्रकारात एक टेलरमेड गोलंदाज आहे. तो बर्‍याच वर्षांपासून संघात आहे. त्यामुळे व्यवस्थापन जर इशांतला मदत करणारा वेगवान गोलंदाज शोधत असेल तर यादव चांगली निवड सिद्ध होऊ शकतो. यादवने आत्तापर्यंत 48 सामने खेळले आहेत आणि 8.66 च्या इकोनॉमी रेटने148 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 31 आहे. याचा अर्थ की तो सहज एक टोक धरु शकतो. जेव्हा संघाला टेल-एन्डरची आवश्यकता असेल तेव्हा यादव एक उपयुक्त खेळाडू ठरू शकतो. म्हणूनच, बुमराहच्या जागी यादव कदाचित चांगला पर्याय असेल!

3. मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजला कसोटी संघात स्थान देण्यात आले असल्याची बातमी कळताच सर्वांना आश्चर्य वाटले जो की एक मास्टरस्ट्रोक ठरला. मुख्यतः कारण म्हणजे या दौर्‍यादरम्यान जवळपास प्रत्येक ज्येष्ठ खेळाडू अनुपस्थित होते. आणि तो प्रसंगावेळी उभा राहिला आणि त्याने पुन्हा एकदा पुढाकाराने नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियन दौर्‍यादरम्यान त्याची कामगिरी इतकी प्रभावी होती की प्रत्येकाने त्याची प्रशंसा केली. चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती त्यावेळी सिरजला संघात पसंती मिळाली होती आणि आता चौथ्या सामन्यात देखील या अनुभवी वेगवान गोलंदाजाचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान घेण्यासाठी सिराज मुख्य दावेदार असेल.