IND vs ENG 4th Test 2021: चौथ्या टेस्टसाठी अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत Rohit Sharma यालाही पडला प्रश्न, शेअर केली मजेदार पोस्ट

गुलाबी बॉल टेस्ट दोन दिवसांत संपल्यानंतर मोटेरा ट्रॅकला चहुबाजूने टीकेला सामोरे जावे लागल्याने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीवर सुरु झालेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ओपनर रोहित शर्माने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत टीकारांची फिरकी घेतली.

IND vs ENG 4th Test 2021: चौथ्या टेस्टसाठी अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत Rohit Sharma यालाही पडला प्रश्न, शेअर केली मजेदार पोस्ट
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test 2021: गुलाबी बॉल टेस्ट दोन दिवसांत संपल्यानंतर मोटेरा (Motera) ट्रॅकला चहुबाजूने टीकेला सामोरे जावे लागल्याने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील (Narendra Modi Stadium) खेळपट्टीवर सुरु झालेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत टीकारांची फिरकी घेतली. अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतावर फिरकीला अनुकुल खेळपट्ट्या बनवल्याची टीका केली. शिवाय, विदेशी माजी खेळाडूंसह युवराज सिंह, हरभजन सिंह यासारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील खेळपट्टीवर निराशा व्यक्त केली. यादरम्यान, आता अहमदाबादच्या (Ahmedabad) याच खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना देखील रंगणार आहे त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी कशी खेळपट्टी असेल याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे आणि टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा देखील याला अपवाद नाही. (IND vs ENG 4th Test 2021: ICC च्या 'रेड आय' मधून मोटेराची होणार सुटका, चौथ्या अहमदाबाद टेस्टसाठी अशी असणार खेळपट्टी)

रोहितने इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो मैदानात पालथा झोपून समोर पाहात असलेला दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आणि लिहिले की ‘चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल याचा विचार करत आहे.’ अलीकडेच रोहित म्हणाला की, 'दोन्ही संघांसाठी खेळपट्टी सारखीच आहे. याची इतकी चर्चा का होत आहे हे मला समजत नाही. दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळतात. लोक बोलतात की खेळपट्टी अशी असायला हवी तशी नाही. पण, भारतातील खेळपट्टी गेली अनेक वर्षे अशीच बनत आली आहे. मला नाही की काहीही बदलले आहे आणि काही बदल झाले पाहिजे." रोहित म्हणाला,"सर्व लोक होम ग्राउंडचा फायदा घेतात. जेव्हा आपण बाहेर गेलो तेव्हा तिथेही असेच घडते. आपल्यासाठी कोणीही असा विचार करीत नाही की आपल्याला हे करायला पाहिजे आपल्याला ते करायला पाहिजे. तर आम्ही दुसऱ्यांचा का विचार करावा. आम्हाला काय पाहिजे आणि आमच्या कार्यसंघाला जे हवे आहे ते पूर्ण केले पाहिजे. याचा अर्थ घर आणि बाहेरचा फायदा आहे."

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

तिसऱ्या पिंक-बॉल टेस्टनंतर मोटेराच्या खेळपट्टीवर टीका केली गेली ज्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल यावर सर्वांचेच लक्ष लागून आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन डावांमध्ये इंग्लिश संघाला अनुक्रमे 112 आणि 81 धावांवर बाद करत टीम इंडियाने अहमदाबाद येथे दोन दिवसात इंग्लंडला 10 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून गेलेल्या 30 पैकी 28 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या, त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजांना काहीच मदत नव्हती, खेळपट्टी केवळ फिरकी गोलंदाजांना अनुकुल होती, अशा टीका झाल्या.

(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2021 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).