विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु होणार आहे. सामन्यापूर्वी टॉस दरम्यान इंग्लिश कर्णधार जो रूटने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया (Team india) सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तर मालिकेच्या दृष्टीकोनातून पाहुणा संघासाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. अशास्थितीत, चौथ्या टेस्ट सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल झाले आहे. यजमान टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराजचा समावेश झाला आहे. दुसरीकडे, जो रूटच्या इंग्लिश टीमने स्टुअर्ट ब्रॉडला बाहेर करत डोम बेस आणि जोफ्रा आर्चरच्या जागी डॅन लॉरेन्सला अंतिम-इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. (IND vs ENG 4th Test 2021: एमएस धोनीची बरोबरी करत Virat Kohli ने रचला इतिहास, भारतीय कर्णधारांच्या एलिट यादीत संयुक्तपणे पटकावले पहिले स्थान)

टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून डोम सिब्ली आणि झॅक क्रॉलीची जोडी डावाची सुरुवात करेल. जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स आणि ऑली पोपवर मधल्या फळीत धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी असेल. बेन फोक्स संघाचा विकेटकीपर आहे. इंग्लिश टीमने गोलंदाजी विभागात दोन बदल करत स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी डोमिनिक बेस आणि जोफ्रा आर्चरच्या जागी डॅन लॉरेन्सचा समावेश केला आहे. बेस आणि जॅक लीचच्या जोडीपुढे फिरकीमध्ये भारतीय खेळाडूंना अडकवण्याचे मोठे आव्हान असेल. शिवाय, जेम्स अँडरसन संघात एकमेव वेगवान गोलंदाज आहे. दुसरीकडे, भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला येईल. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल तर रिषभ पंत विकेटच्या मागे यष्टीरक्षकाची भूमिका निभावेल. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकी जोडीवर यंदाही विकेट घेण्याची मोठी जबाबदारी असेल तर बुमराहच्या अनुपस्थितीत इशांत शर्माला सिराजची साथ मिळेल.

पहा भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जॅक लीच, डोमिनिक बेस आणि जेम्स अँडरसन.