IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अक्षरच्या फिरकीचा बोलबाला, इंग्लंडने भारताविरुद्ध केली सर्वात Lowest धावसंख्या, पहा सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अहमदबादच्या (Ahmedabad) तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला 81 धावांवर गुंडाळलं. सामन्याच्या पहिल्या डावात सहा विकेटच्या जोडीला अक्षरने दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्याचा निर्णय दुसर्‍याच दिवशी निश्चित झाला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 49 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने सहज गाठले आणि इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. या विजयाने कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. संघाचा सलामी फलंदाज फलंदाज रोहित शर्माने नाबाद 25 आणि शुभमन गिलने नाबाद 15 धावांसह संघाला विजयीरेष ओलांडून दिली. पिंक-बॉल टेस्ट सामन्यात काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (World Test Championship Final 2021: इंग्लंडचा खेळ खल्लास! WTC फायनलच्या शर्यतीतून इंग्लिश संघ आऊट, टीम इंडियाची पहिल्या स्थानी झेप)

1. घरच्या मैदानावर भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीने एमएस धोनीला मागे टाकत सर्वाधिक कसोटी विजय मिळवले. 30 कसोटी सामन्यांमध्ये धोनीने 21 तर कोहलीने आता कर्णधार म्हणून 22 कसोटी सामने जिंकले आहेत.

2. भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात 842 चेंडूचा खेळ झाला आणि दुसर्‍या महायुद्धानंतर बॉलने खेळला गेलेला सर्वात छोटा कसोटी सामना ठरला.

3. आशिया खंडातील दोन दिवसांत पूर्ण होणार भारत-इंग्लड संघातील फक्त तिसर्‍या कसोटी सामना ठरला.

4. रविचंद्रन अश्विन अवघ्या 77 कसोटी सामन्यांमध्ये 400 कसोटी विकेटचा टप्पा पूर्ण करणारा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला.

5. अश्विन मुथय्या मुरलीधरननंतर 400 कसोटी विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. श्रीलंकन मुरलीधरनने 72 टेस्ट सामन्यात हा पराक्रम केला होता.

6. जो रुटने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथम पाच गडी बाद केले. 5/8 आकडेवारी देखील त्याची सर्वोत्तम कसोटी आकडेवारी आहे.

7. अक्षर पटेलने पहिल्यांदा कसोटी सामन्यात 10-विकेट घेतल्या आणि त्यानंतर सलग तिसऱ्यांदा एका डावात 5 किंवा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला.

8. रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 11व्या वेळी नडला. आतापर्यंत 20 डावांपैकी 11 डावात अश्विनने बेन स्टोक्सला माघारी धाडलं आहे.

9. गुलाबी चेंडूने कसोटी सामन्यात 11 विकेट घेणारा अक्षर पटेल पहिलाच क्रिकेटर ठरला. त्याने पहिल्या डावात 38 धावांवर 6 गडी आणि दुसऱ्या डावात 32 धावांवर 5 विकेट घेतल्या.

10. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे, तो कसोटीमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट्स घेणारा जगातील चौथाच तर भारताचा दुसराच फिरकीपटू ठरला आहे.

भारताने आता चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेली असून चौथ्या कसोटी सामन्यात पराभव टाळल्यास मालिका जिंकू शकतात. दुसरीकडे इंग्लंडला कसोटी मालिका अनिर्णीत करण्यासाठी विजयाची गरज आहे. जो रुटचा इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.