World Test Championship Final 2021: टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेटने दिमाखदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप (World Test Championship) फायनलच्या अगदी जवळ पोहोचली आहे तर इंग्लंड टीमचे लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर फायनल खेळण्याचे स्वप्न भंग झाले आहे. इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघाला आता चौथ्या सामन्यात देखील विजय मिळवणे गरजेचे आहे. भारतीय संघ इंग्लंडकडून चौथा कसोटी सामना हरला तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसह (New Zealand) वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. (IND vs ENG 2nd Test Day 2: ‘कॅप्टन’ विराटची कमाल! अहमदबाद टेस्ट सामन्यात कोहलीने MS Dhoni यालाही सोडलं पिछाडीवर, बनला भारतातील यशस्वी कर्णधार)
गेल्या महिन्यात श्रीलंकाविरुद्ध 2-0 च्या ऐतिहासिक क्लीन स्वीपनंतर इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्याची स्वतःसाठी संधी निर्माण केली होती. त्यांना फक्त भारताचा भारतात पराभव करणे आवश्यक होते जे यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये 2-1 च्या फरकाने केले होते. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रूटच्या दुहेरी शतकासह दिमाखदार अंदाजात इंग्लंडने मालिकेची सुरुवात ऐकली होती पण, दुसर्या चेन्नई कसोटी सामन्यात 317 धावांनी बरोबरी साधत जबरदस्त पुनरागमन केले. टाय असूनही अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला आणखी एक विजय आवश्यक होता, पण अहमदाबाद ट्रॅकवर दोनदा 150 पेक्षा धावसंख्येवर बाद झाले. दुसरीकडे, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या एक पाऊल जवळ आले आहेत जिथे न्यूझीलंड प्रतिस्पर्ध्याची प्रतीक्षा करीत आहे. अहमदाबादमध्ये होणारा अंतिम सामन्यात विजय किंवा ड्रॉ भारताला फायनलचे तिकीट मिळवून देऊ शकते.
India’s stunning 10-wicket victory in the third Test has knocked England out of the race for the #WTC21 final.#INDvENG report 👇https://t.co/Jxp30CsrWN
— ICC (@ICC) February 25, 2021
दुसरीकडे, भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या आशा अद्यापही पल्लवित आहेत. जर इंग्लंड चौथ्या कसोटीत विजयासह मालिका अनिर्णीत करण्यात यशस्वी झाल्यास ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल आणि यजमान भारताच्या मिळतील.