IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सच्या बाल्कनीत Virat Kohli ने केला नागीन डान्स, सहकाऱ्यांनाही फुटले हसू, पाहा व्हायरल Photo
लॉर्ड्सच्या बाल्कनीत विराट कोहलीचा नागिन डान्स (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. कसोटीचा दुसरा दिवस इंग्लिश संघाच्या नावावर राहिला. जेम्स अँडरसन आणि कर्णधार जो रूटच्या (Joe Root) जोरावर इंग्लंडने सामन्यात आव्हान कायम ठेवले आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला, तर इंग्लंडने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 विकेट्स गमावून 119 धावा केल्या. विराट कोहलीने कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्याची (England Tour) चांगली सुरुवात केली आहे आणि भारतीय संघाने (Indian Team) आतापर्यंत या दौऱ्यावर ब्रिटिशांवर वर्चस्व गाजवले आहे. मैदानावर आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये विराट लॉर्ड्सच्या बाल्कनीत नागीन डांस (Naagin Dance) करताना दिसत आहे. (IND vs ENG 2nd Test Day 3: लॉर्ड्सवर आज ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची जादू चालली तर टीम इंडियाचा विजय निश्चित)

कोहलीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाचताना कोहलीच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य फुलले आहे. तसेच मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि मयांक अग्रवाल देखील लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीच्या या मजेदार डांसचा आनंद घेत आहेत. सर्वजण खूप आनंदी आणि हसत आहे.लॉर्ड्स कसोटीत भारतीय कर्णधार कोहलीने पहिल्या डावात 42 धावा केल्या. कोहली गेल्या 48 डावांपासून कसोटीत शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध डे/नाईट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या दीर्घ स्वरुपात अखेरीस तिहेरी धावसंख्येचा पल्ला गाठला होता. एका चाहत्याने कोहलीचा डान्स फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘कोहली नागिन नृत्य करत आहे की काहीतरी?’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘किंग कोहली लॉर्ड्सच्या बाल्कनीत डान्स करतोय.’

दरम्यान, कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला ठरला नाही आणि टीम इंडियाने आपले उर्वरित 7 विकेट्स गमावून आणखी 88 धावा काढल्या. केएल राहुल 129 धावा केल्या. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने पाच विकेट्स काढल्या.