IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंड (England) विरुद्ध भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या डावात 364 धावांचा डोंगर उभारला आहे. सलामीवीर केएल राहुलने संघासाठी चांगली फलंदाजी करत 129 धावांचे सर्वोच्च शतकी कामगिरी बजावली. याशिवाय अनुभवी फलंदाज रोहित शर्माने संघासाठी 83 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाने पहिल्या डावात 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी तीन गडी गमावून 119 धावा केल्या. (IND vs ENG 2nd Test: बिचारा कोहली! इंग्लिश कर्णधारविरुद्ध Rishabh Pant ने विराटला DRS घेण्यासाठी ‘असे’ केले मना, मजेदार व्हिडिओ झाला व्हायरल)
इंग्लिश संघासाठी कर्णधार जो रूटने (Joe Root) 75 चेंडूत सहा चौकारांसह नाबाद 48 आणि जॉनी बेअरस्टोने 17 चेंडूत सहा धावा करून खेळत आहेत. रूट आणि बेअरस्टोवर यजमान संघाचा डाव सावरण्याची मदार असेल. यजमान संघ अद्यापही पहिल्या डावात टीम इंडियाच्या 245 धावांनी पिछाडीवर आहे. अशास्थितीत जर भारतीय संघ तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडला लवकर गुंडाळण्यात यशस्वी झाला तर लॉर्ड्स कसोटीवर त्यांची पकड मजबूत होऊ शकते. भारतीय संघासाठी सध्या 27 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) मैदानात खूप प्रभावी ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने आतापर्यंत दोन विकेट्स काढल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तिसऱ्या दिवशीही त्यांची जादू मैदानात कायम राहिली तर टीम इंडिया यजमान संघावर मानसिक दबाव आणण्यात यशस्वी होऊ शकते.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने आतापर्यंत 13 ओव्हर गोलंदाजी केली आहे आणि 34 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इंग्लंडचा सलामीवीर डोम सिब्ली आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हसीब हमीदला पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सिराजच्या कसोटी क्रिकेटमध्ये आजवरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याच्यात विकेट घेण्याच्या प्रतिभेची कमतरता नाही. त्याने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सात सामन्याच्या 13 डावांमध्ये 30.7 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही सिराजच्या नावावर आहे. तसेच लॉर्ड्सवर सिराज पाच विकेट्स घेण्यात यशस्वी झाला तर ऑनर्स बोर्डवर त्याचे नाव सुवर्ण अक्षराने अंकित केले जाईल.