IND vs ENG 2nd Test: बिचारा कोहली! इंग्लिश कर्णधारविरुद्ध Rishabh Pant ने विराटला DRS घेण्यासाठी ‘असे’ केले मना, मजेदार व्हिडिओ झाला व्हायरल
विराट कोहली व रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) हाती पुन्हा रिव्यू घेण्यात अपयश आले. लॉर्ड्स (Lords) येथे सुरु असेल्या इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने (Indian Team) सलग दोन षटकांत दोन रिव्यू गमावले आणि तेही एकाच ब्रिटिश फलंदाज, जो रूट (Joe Root), विरोधात. मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) दोनदा वाटले की त्याच्याकडे रूट एलबीडब्ल्यू आहे, पण भारताने दोन रिव्यू गमावले कारण मैदानावरील पंच माइकल गफ (Michael Gough) यांनी दोन्ही प्रसंगी ते अयोग्य असल्याचा निर्णय सुनावला. शिवाय मैदानावरील अंपायरच्या एका निर्णयावर रिव्यू घेण्यासाठी स्वतः विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) कॅप्टन विराटला थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. (IND vs ENG 2nd Test Day 2: मोहम्मद सिराजने इंग्लंडला दोन चेंडूत दिले दोन झटके, पुनरागमन करणारा घातक फलंदाज शून्यावर माघारी)

लॉर्ड्स येथे दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने इंग्लंडला सलग दोन चेंडूवर मोठे झटके दिले. डॉमिनिक सिब्ली पाठोपाठ ब्रिटिश कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या हसीब हमीदला सिराजने माघारी धाडलं व यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले. पण दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसादरम्यान, भारतीय कर्णधार पुन्हा दोन रिव्यू वाया घालवण्यासाठी दोषी आढळला. कोहलीने एकाच ओव्हरमध्ये अँपिर माइकल गफ यांच्या निर्णयाला त्याच्या सहकाऱ्यांच्या विशेषत: रिषभ पंतच्या विरोधात आव्हान दिले. हे सर्व 21 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूने सुरू झाले जेव्हा सिराजचा चेंडू इंग्लंड कर्णधार जो रूटच्या पॅडवर आदळला. गफने फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सिराज यांनीच कोहलीला निर्णयाला आव्हान देण्यास भाग पाडले. जो चुकीचा ठरला.

त्यानंतर, त्याच्या पुढच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजने पुन्हा एकदा अशाच पद्धतीने रूटविरुद्ध गोलंदाजी केली. सिराज रिव्यूबद्दल फारसा उत्सुक नसताना कोहलीनेच पुढे जाऊन पंचांना फक्त एक सेकंद शिल्लक असताना रिव्यूचा संकेत दिला. पंतने कोहलीसमोर रिव्यू न घेण्याची का विनवणी केली ते रिप्ले पाहून पुष्टी झाली कारण चेंडू यथायोग्य फरकाने विकेटपासून दूर असल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारे विराट DRS घेण्याच्या निर्णयाने पुन्हा एकदा तोंडघशी पडला.