IND vs ENG 2nd Test Day 3: चेपॉकच्या (Chepauk) मैदानावर लोकल बॉय रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारतीय संघ (Indian Team) विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दुसऱ्या चेन्नई सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या लंचपर्यंत यजमान टीम इंडिया (Team India) विजयापासून आता फक्त 3 विकेट दूर आहे तर पाहुण्या संघाला 366 धावांची गरज आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा झाली तेव्हा कर्णधार जो रूट (Joe Root) 33 धावा करून खेळत होता. दुसरीकडे, टीम इंडियाकडून अश्विनने आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 3 तर कुलदीप यादवला 1 विकेट मिळाली. यापूर्वी, अश्विनने पहिल्या डावांत गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावांत शतकी खेळी करत भारतीय संघाला 481 धावांची आघाडी मिळवून दिली. अश्विनने दुसऱ्या डावात 134 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5वे शतक ठरलं. अश्विनच्या शतकी खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करता आल्या. (IND vs ENG 2nd Test: Ash Anna ‘चेपाकचा मास्टर’! दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यात अश्विनच्या शानदार खेळीनंतर पत्नी प्रीतीचं धमाकेदार Tweet, पाहून व्हाल खुश)
चेन्नईमध्ये चौथ्या दिवशी इंग्लंडने अडखळत सुरुवात केली. इंग्लंड संघानं 3 बाद 53 धावांपासून डॅन लॉरेन्स आणि कॅप्टन जो रूटने दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. अश्विनने चौथ्या दिवसाच्या 26व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौथा धक्का दिला आणि विकेटकीपर रिषभ पंतने डॅन लॉरेन्स स्टंपिग आऊट केलं. लॉरेन्सने 26 धावा केल्या. यानंतर, अश्विनने बेन स्टोक्सला आऊट करत पाहुण्या संघाच्या अडचणी वाढ केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टोक्सला आऊट करण्याची अश्विनची ही 14वी वेळ ठरली. स्टोक्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि 51 चेंडू खेळत फक्त 8 धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या डावात अश्विनच्या फिरकीच्या अडकलेला स्टोक्सला दुसऱ्या डावातही अश्विननेच पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. यानंतर, अक्षरने पोपला बाद करत इंग्लंडला सहा धक्का दिला. अशाप्रकारे, पाहुण्या संघाने 110 धावांत 6 विकेट गमावल्या. कर्णधार जो रुट अद्याप मैदानावर आहे तर भारतीय संघाला विजयासाठी 4 विकेटची गरज आहे.
यापूर्वी, यजमान भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला 134 धावांवर गुंडाळत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या आणि मिळालेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले.