IND vs ENG 2nd Test: Ash Anna ‘चेपाकचा मास्टर’! दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यात अश्विनच्या शानदार खेळीनंतर पत्नी प्रीतीचं धमाकेदार Tweet, पाहून व्हाल खुश
‘चेपाक मास्टर’ रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यात बॅट आणि बॉलने दमदार कामगिरी केली. पहिले इंग्लंडच्या 5 फलंदाजांना स्वस्तात बाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं, तर बॅटने भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकत शंभरी गाठली. अश्विनच्या या खेळीचे चहुबाजूने कौतुक होत असताना पतीच्या या कामगिरीवर त्याची पत्नी प्रिती (Prithi) देखील भलतीच खुश आहे. अश्विनची पत्नी प्रीति ही त्याच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहे आणि तिच्या पतीच्या कर्तृत्वाचा आनंद साजरा करण्यासाठी तिने एक मजेदार पण धमाकेदार ट्विट पोस्ट केले. अभिनेता विजय आणि दिग्दर्शक लोकेश कानगराज यांचा नुकताच तामिळ हिट चित्रपट ‘मास्टर’च्या (Master) पोस्टरमध्ये अश्विनला म्हणून ‘मास्टर’ दाखवणारा फोटो तिने शेअर केला. ‘मास्टर’ च्या पोस्टरवर अश्विनच्या फोटोशॉप फोटो पाहून क्रिकेट चाहतेही चांगलेच प्रभावित झालेले दिसत आहे. (IND vs ENG 2nd Test Day 3: Chepauk वर Ashwin वादळ, चौकारासह पूर्ण केले शानदार 5वे कसोटी शतकासह केले अनेक कीर्तिमान)

सामन्याबद्दल बोलायचे तर, अश्विनने 148 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 106 धावा फटकावल्या. चहापानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराज 16 धावांवर नाबाद राहिला आणि अश्विनसमवेत अंतिम विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने डोम सिब्ली 3 धावा आणि रोरी बर्न्सच्या मूल्यवान विकेटसह तसेच नाईट-वॉचमन जॅक लीचची विकेट गमावली. सिब्लीने3 धावा आणि बर्न्सने25 धावा केल्या तर लीच शून्यावर परतला. अश्विनच्या शतकी खेळीपूर्वी चेन्नईच्या या फिरकीपटूने इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच विकेट्स बाद केल्या आणि तीन वेगवेगळ्या प्रसंगी त्याने एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणारा दुसरा क्रिकेटपटू बनला. इंग्लंडच्या इयन बोथमने पाच वेळा हा पराक्रम केला आहे.

तत्पुर्वी भारताचा पहिला डाव 330 धावांवर संपुष्टात आल्यावर अश्विनच्या पाच विकेटने इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या 134 धावांवर गारद केलं, त्यामुळे भारताला पहिल्या डावात 195 धावांची मोठी आघाडी मिळाली. सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने दीडशतकी कामगिरी बजावली. रोहितने पहिल्या डावात 161 धावा केल्या. दुसरीकडे, पहिल्या डावात इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतकी धावसंख्या पार करू शकला नाही. बेन फोक्स नाबाद 42 धावा करून परतला होता.