IND vs ENG 2nd Test Day 5: भारताच्या (India) खालच्या फळीतील फलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि अंतिमच्या दिवशी आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताचा सामन्यात दबदबा निर्माण केला. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शमीने यादरम्यान फिरकी गोलंदाज मोईन अलीच्या गोलंदाजीवर षटकार खेचून आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. या दरम्यान शमीने एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि त्याने क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे. लंच ब्रेकपर्यंत शमी 52 धावांवर नाबाद होता आणि भारताने दुसरा डाव 298/8 वर घोषित केल्यार तो 56 धावांवर नाबाद परतला. (IND vs ENG 2nd Test Day 5: Mohammed Shami बनला सेहवाग, उत्तुंग षटकार खेचत ठोकले दमदार अर्धशतक; इंग्लंडचा उडाला गोंधळ)
यासह, शमीने ‘क्रिकेटची पांढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर (Lords Ground) आपली सर्वोत्तम धावसंख्येची नोंद केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी केलेल्या सर्वोत्तम धावसंख्येपेक्षा त्याचा स्कोअर जास्त आहे. भारताने पाचव्या दिवशी 298/8 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित करत इंग्लंडसमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात शमी 70 चेंडूत 55 धावांवर नाबाद परतला, ज्यात सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय बुमराहने नाबाद 34 धावा केल्या, जे त्याच्या कारकिर्दीतील देखील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
भारताने पाचव्या दिवशी 181/6 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत व ईशांत शर्मा सकाळी लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्य अडचणीत आणखी भर पडली. मात्र नंतर शमी आणि बुमराहने फलंदाजीची सूत्रे हाती घेत इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांमध्ये 89 धावांची नाबाद भागीदारी झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच पंतच्या रुपात मोठा धक्का बसल्यानंतर शमी-बुमराहच्या करिश्माई कामगिरीच्या बळावर संघाला मजबूत आघाडी मिळाली. पंतपाठोपाठ काही अंतराने ईशांत शर्माही पॅव्हिलियनमध्ये परतला. मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला.