मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 5: भारताने (India) सोमवारी इतिहास रचला आणि दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा (England) 151 धावांनी पराभव करून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) सात वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये विजय मिळवला. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दिवशी सामना भारताच्या बाजूने फिरवला जेणेकरून ‘विराटसेने’ने ‘क्रिकेटची पंढरी’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा कसोटी विजय नोंदला आणि एमएस धोनीच्या नेतृत्वातील 2014 प्रसिद्ध विजयाची पुनरावृत्ती केली. तत्पूर्वी, भारताने आपला दुसरा डाव 298 वर घोषित करत इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले. पण संघ अवघ्या 120 धावांवर ढेर झाला. सामन्याच्या निर्णायक पाचव्या दिवशी खेळाडूंनी काही रेकॉर्डस् नोंदवले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर महामुकाबल्यात टीम इंडियाच्या विजयाची 3 मोठी कारणे जाणून घ्या)

1. कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनीनंतर लॉर्ड्समध्ये कसोटी जिंकणारा विराट कोहली (Virat Kohli) तिसरा भारतीय कर्णधार ठरला.

2. भारताच्या कसोटी इतिहासात स्पिनरने सलग कसोटीत विकेट न घेण्याची ही दुसरी घटना आहे.

3. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजयांच्या यादीत कोहली आता चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 63 पैकी 37 सामन्यात यशस्वी संघाचे नेतृत्व केले आहे.

4. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी एकाच कसोटी डावात घरच्या मैदानावर भोपळा न फोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

5. लॉर्ड्सच्या दुसऱ्या डावात 120 ही इंग्लंडची घरच्या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

6. लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा हा तिसरा विजय ठरला आहे. विदेशी मैदानावर हा टीम इंडियाचा संयुक्तपणे तिसरा सर्वाधिक विजय ठरला आहे. भारताने पोर्ट ऑफ स्पेन/किंग्स्टन/कोलंबो SSC येथे देखील तीन कसोटी सामने जिंकले आहेत.

7. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने दुसऱ्या कसोटीच्या 5 व्या दिवशी आश्चर्यकारक कामगिरी केली व 10 वर्षांनंतर आशियाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये 9 व्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली. यापूर्वी राहुल द्रविडने अमित मिश्रासह 2011 मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध हा महान पराक्रम केला होता.