IND vs ENG: कर्णधार विराट कोहली दिग्गजांना मागे टाकण्याच्या नजिक, इंग्लंडविरुद्ध ‘रनमशीन’च्या रडारवर ‘हे’ 6 मोठे पराक्रम
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: उद्घाटन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील संधी गमावल्यानंतर, टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा दुसऱ्या डब्ल्यूटीसी (WTC) सायकलमध्ये सुरवातीपासून सुरुवात करेल. विराट कोहली आणि टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंडविरुद्ध (England) 4 ऑगस्टपासून मैदानात उतरेल. बेन स्टोक्स आणि अननुभवी फलंदाजांच्या जोरावर यजमान संघ कमजोर दिसत आहे तर भारत पुन्हा एकदा कोहलीवर अवलंबून राहणार आहे, जो विशेषत: बॅटने पुढाकाराने नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. 32 वर्षीय कोहलीने आयसीसी-ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची पहिली संधी गमावली असताना इंग्लंडविरुद्ध मालिकेत विराटच्या रडारवर माजी दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड असतील जे खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 1st Test: भारताविरुद्ध माईंड गेम खेळण्यास सुरुवात, खेळपट्टीबाबत दिग्गज इंग्लंड गोलंदाजाने केले ‘हे’ मोठे भाष्य)

1) 8,000 कसोटी धावा

कोहलीच्या नावावर सध्या 92 कसोटीत 7,547 धावा आहेत. तो 8,000 धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. मात्र त्याला आगामी पाच कसोटींमध्ये हा पल्ला गाठण्यासाठी 453 धावांची गरज आहे. त्यामुळे त्याला 2018 इंग्लंड कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती किंवा त्याच्यापुढे जायची गरज आहे.

2) इंग्लंड विरुद्ध 2,000 कसोटी धावा

भारतीय कर्णधाराने कसोटीत इंग्लंड विरुद्ध 1,742 धावा केल्या आहेत. तो 2016 पासून इंग्लंड विरुद्ध फॉर्ममध्ये आहे, तथापि, यंदा वर्षीच्या सुरुवातीला ने माफक कामगिरी केली त्यामुळे त्याला थ्री लायन्सविरुद्ध कसोटीत 2 हजार धावा जमा करण्यासाठी आणखी 258 धावांची गरज आहे.

3) कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके

आणखी एका शतकासह, कोहली केवळ त्याच्या दीर्घकालीन शतकाचा दुष्काळ मोडून काढणार नाही, तर एकूणच एका कर्णधाराने केलेल्या सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतकांची देखील नोंद करेल. सध्या, आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून त्याने 41 शतके केली आहेत आणि रिकी पाँटिंगच्या बरोबरीत आहे.

4) दुसरे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक

कोहलीचा हा विक्रम बऱ्याच काळापासून वाट पाहत आहे. आणखी एका तिहेरी आकडी खेळीसह, भारतीय कर्णधार 71 आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद करेल आणि पाँटिंगच्या आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. सचिन तेंडुलकरने एकूण 100 आंतरराष्ट्रीय शतक केलेली आहेत.

5) क्लाईव्ह लॉयड यांच्या पुढे

इंग्लंडविरुद्ध एका विजयासह, कोहली लॉईडचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम मागे टाकेल. कोहली आणि महान विंडीज खेळाडूने आतापर्यंत संयुक्तपणे एकूण 36 विजय मिळवले आहेत. कोहलीने मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली तर तर तो विजयाच्या दृष्टीने एकूण पाचवा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनेल.

6) सेना देशांमध्ये सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार

आणखी एका विजयासह कोहली सेना देशांमधील सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार बनेल. माजी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियांदाद आणि विराटने या देशांमध्ये संयुक्तपणे 4 विजय मिळवले आहेत.