IND vs ENG 1st Test Day 1: रिषभ पंतने DRS घेण्यासाठी विराट कोहलीला पटवले; कॅच व स्टंप आऊट न करता भारताला मिळवून दिले मोठे यश, व्हिडिओ पाहून म्हणाल वाह!
विराट कोहली आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 1st Test: यजमान इंग्लंड (England) आणि टीम इंडिया (Team India) यांच्यात नॉटिंगहम (Nottingham) येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करत इंग्लंड संघाने पहिल्या सत्रात 2 गडी गमावले. या दरम्यान दुपारच्या जेवणापूर्वी काही षटके शिल्लक असताना विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) DRS रिव्यू घेण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीला  (Virat Kohli) पटवले, ज्यामुळे झॅक क्रॉली पॅव्हिलियनमध्ये परतला आणि या पंतने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. बुमराहने रोरी बर्न्सला पायचीत करत इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका दिला. डोम सिब्ली व झॅक क्रॉली (Zak Crawley) यांनी चांगली भागीदारी रचून यजमान संघाने 20 ओव्हरमध्ये 41/2 धावांपर्यंत मजल मारली. (IND vs ENG 1st Test Day 1: टीम इंडिया गोलंदाजांचा इंग्लंडला दणका, दुपारच्या जेवणापर्यंत ब्रिटिश टीम 2 बाद 61 धावा)

आता सामन्याच्या मोहम्मद सिराजच्या 21व्या ओव्हरमध्ये असे काहीतरी घडले, ज्यानंतर सोशल मीडियावर पंतची सर्वत्र चर्चा होत आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने प्रथम रिव्ह्यू घेतला जो अपयशी ठरला. पण यानंतर, त्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर पंतने कर्णधार कोहलीला रिव्यू घेण्यास भाग पाडले आणि पंतच्या समजूतदारपणावर विश्वास ठेवत कर्णधाराने रिव्यू घेतला आणि झॅक क्रॉलीला 67 चेंडूत 27 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सिराजने आणखी एक घातक स्विंगर टाकला ज्यामुळे आणखी एक संधी निर्माण झाली. पंतने चेंडू पकडला व भारतीयांनी आणखी अपील केले पण मैदानावरील पंचांनी अपील नाकारली. यावेळी, क्षेत्ररक्षकांना देखील खात्री नव्हती शिवाय, कर्णधार विराट कोहली देखील थोडा अनिश्चित होता. तथापि, पंतने त्याला DRS घेण्यासाठी पटवले व त्याच षटकात दुसरा आढावा घेण्यास त्याला राजी केले. पाहा व्हिडिओ:

दरम्यान, DRS रिव्यू योग्य ठरल्यावर विराट कोहलीने देखील पंतसमोर डोके टेकले व हस्तांदोलन केले.

सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंड दौऱ्यावर मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर होत असून भारतीय संघाने सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉरी बर्न्सला शून्यावर पायचीत करत माघारी धाडले. त्यांनतर सिब्ली आणि क्रॉलीची भागीदारी रंगत असताना सिराजने क्रॉलीला बाद करत ही भागीदारी तोडली. क्रॉलीने 67 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा केल्या. कर्णधार जो रुटने सिब्लीला साथ देत पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी विकेट जाणार नाही याची काळजी घेतली.