जेम्स अँडरसन-विराट कोहली (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसन (James Anderson) विरुद्ध विराट कोहली  (Virat Kohli) स्पर्धा ही एक अशी स्पर्धा आहे ज्याची प्रतीक्षा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला असते. इंग्लंड  (England) आणि भारत (India) यांच्यातील कसोटी सामन्याची प्रत्येकजण वाट पाहतो. अशास्थितीत नॉटिंगहम येथील ट्रेंट ब्रिज Trent Bridge) मैदानावर गुरुवारी काही वेगळे घडले नाही. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार फलंदाजीला उतरला आणि जेम्स अँडरसनसमोर विराट ‘गोल्डन डक’चा शिकार झाला. टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद करणे प्रत्येक वेळी घडत नाही पण जेव्हा असे होते तेव्हा गोलंदाजाच्या आनंदाजी मर्यादाच नसते. आणि अँडरसनसोबत देखील असेच घडले. (IND vs ENG 1st Test 2021: ‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ Virat Kohli याच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम, टीम इंडिया कॅप्टनविरुद्ध अँडरसनचा बोलबाला)

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जेम्स अँडरसन म्हणाला, “मी त्यावर जास्त लक्ष केंद्रित न करण्याचा प्रयत्न करतो (विराट कोहलीशी त्याची लढाई). मला वाटते की आम्ही गोलंदाज म्हणून जे करतो ते करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या ताकदीनुसार सर्वोत्तम काम करा. मी दोन सलामीवीरांपासून दूर चेंडू स्विंग करण्याचा आणि आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी यष्टीवर हल्ला करण्याचा आणि सरळ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत होतो. तुम्हाला वैयक्तिक लढाया त्यापासून दूर ठेवाव्या लागतील.” विराटची विकेट काढल्यावर त्याच्या आनंदाच्या उत्सवाबद्दल बोलताना अँडरसन म्हणाला, “त्याची मोठी विकेट आहे. चेंडू मला जिथे हवा तिथे तसाच फेकणे आणि त्याला त्याची बॅट लागणे. जागतिक दर्जाच्या खेळाडूची विकेट काढणे नेहमीच चांगले असते आणि तो निश्चितच सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तिथे काही भावना होत्या, त्याला आऊट केल्यानंतर भावना बाहेर आल्या. संघाला सामन्यात पुनरागमन करून देणे आणि त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूला आऊट करणे, भावना बाहेर येतात.”

दरम्यान, विराटला दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवणे 39 वर्षीय अँडरसनसाठी हा एक 'असामान्य' अनुभव होता. अँडरसनने कोहलीला बाद करताच माजी भारतीय दिग्गज अनिल कुंबळे यांच्या 619 कसोटी विकेट्सची बरोबरी केली. अशाप्रकारे आता अँडरसन सार्वकालीन महान गोलंदाजांच्या टॉप-3 यादीत सामील होण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे.