IND vs ENG 1st Test 2021: ‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ Virat Kohli याच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम, टीम इंडिया कॅप्टनविरुद्ध अँडरसनचा बोलबाला
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय  (India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) निराशा केली. विराट पहिल्या डावात काहीतरी खास करेल अशी अपेक्षा होती, पण तसे अजिबात घडले नाही. कोहलीविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा ब्रिटिश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) बोलबाला दिसला. अँडरसनने त्याला जास्तवेळ क्रीजवर टिकू राहू दिले नाही आणि त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन तंबूत परतला. अँडरसनच्या चेंडूवर विराट विकेटच्या मागे जोस बटलरकडे झेलबाद होऊन गोल्डन डकवर पॅव्हिलियनमध्ये परतला. या कसोटी मालिकेत विराट विरुद्ध अँडरसन संघर्षची चर्चा रंगली होती, ज्यात अँडरसनने बाजी मारली. त्याचबरोबर कोहलीने शून्यावर बाद होऊन टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) लाजिरवाणा विक्रम मोडला. (IND vs ENG 1st Test 2021: Virat Kohli याला पुन्हा नडला James Anderson, भोपळा फोडू न देता पहिल्या चेंडूवर दाखवला तंबूचा रस्ता, पाहा रोचक व्हिडिओ)

विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार बनला आहे. विराट कोहली इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार म्हणून नवव्या वेळी शून्यावर बाद झाला आहे. महेंद्र सिंह धोनी आठ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता. पण आता कोहली धोनीच्या पुढे गेला आहे. तसेच नवाब पतौडी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. माजी करणदाहर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सात वेळा शून्यावर बाद झाले असून कपिल देव यांच्यासोबत सहा वेळा असे घडले आहे. दुसरीकडे, विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार कर्णधार बनला आहे, तर सौरव गांगुली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 9 वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता.

त्याचबरोबर विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये तो तीन वेळा भोपळा फोडू शकला नाही. दुसरीकडे, जेम्स अँडरसनने नवव्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विराट कोहलीचा अडथला दूर केला आहे. कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.