IND vs ENG 1st Test Day 5: अँडरसनचा कहर; टीम इंडिया पराभवाच्या छायेत, लंचपर्यंत भारताच्या 6 बाद 144 धावा
जेम्स अँडरसन आणि ओली पोप (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 1st Test Day 5: चेपॉक स्टेडियमवरील (Chepauk Stadium) भारताविरुद्ध (India) पहिल्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंड (England) गोलंदाजांनी दबदबा राखला. जेम्स अँडरसनने (James Anderson) लंचपर्यंत टीम इंडिया (Team India) अडचणीत पडलं आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान टीम इंडियाने 144 धावांवर 6 विकेट्स गमावल्या आहेत. इंग्लंडच्या अँडरसनने सत्रात तीन, डॉम बेसने 1 आणि जॅक लीचने 2 विकेट घेतल्या आहेत. यामुळे, आता कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यावर संघाच्या फलंदाजीची मदार आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा तेव्हा विराट 45 धावा आणि अश्विन 2 धाव करून खेळत होते. सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु असताना यजमान भारतीय संघावर पराभवाचे संकट गडत होत असताना त्यांना अद्याप विजयासाठी 276 धावांची गरज आहे. (Rohit Sharma Trolled: इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचा ‘फ्लॉप शो’, नाराज Netizensने केली संघाबाहेर काढण्याची मागणी, पहा Tweets)

शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारीच्या जोडीने संघाला पाचव्या दिवशी 1 बाद 39 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. संघाची अर्धशतकी धावसंख्या पूर्ण असताना लीचने टेस्ट स्पेशालिस्ट आणि टीम इंडियाचा संकटमोचन चेतेश्वर पुजाराला 15 धावांवर माघारी धाडलं. यानंतर, गिलने 81 चेंडूमध्ये शानदार कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केलं पण, अर्धशतकी धावांख्येचा टप्पा गाठताच अँडरसनने त्याला आऊट केलं.  शुबमनने 83 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावा केल्या. अजिंक्य रहाणेचे अपयश सुरूच राहिले आणि टीम इंडिया उपकर्णधार भोपळाही फोडू शकला नाही. यासह भारतीय संघाने 100 धावांच्या आत 4 विकेट्स गमावल्या. रिषभ पंतही दुसऱ्या डावात मोठी खेळी शकला नाही आणि 11 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात भारताला सहावा धक्का बसला.

यापूर्वी, चौथ्या दिवशी रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 6 फलंदाजांना आऊट करत पाहुण्या संघाला 178 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडने दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी होती,ज्या मुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात इंग्लंडचा एकही फलंदाजी अर्धशतकी धावसंख्या पार करू शकला नाही. कर्णधार जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या.