रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test 2021: चेन्नईच्या (Chennai) इंग्लंडविरुद्ध (England) चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सलामी फलंदाज रोहित शर्माचा (Rohit Sharma) ‘फ्लॉप शो’ सुरूच आहे. भारत आणि इंग्लंड संघातील सामन्याच्या चौथ्या दिवशी पाहुण्या संघाने 178 धावांपर्यंत मजल मारली आणि यजमान भारताला 420 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले. त्यानंतर, भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्या डावात फलंदाज सुरु केली आणि पुन्हा एकदा रोहित स्वस्तात माघारी परतला. इंग्लंड फिरकीपटू जॅक लीचने (Jack Leech) रोहितला 12 पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी धडपडत असताना भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी फलंदाज रोहितकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र हिटमॅनच्या खराब कामगिरीमुळे नेटकऱ्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. अनेकांनी रोहितला संघाबाहेर काढण्याची देखील मागणी करत मयंक अग्रवाल ही संधी पात्र असल्याचं म्हटलं. (IND vs ENG 1st Test Day 4: रविचंद्रन अश्विन, इशांत शर्माची ऐतिहासिक बॉलिंग, चेन्नईमध्ये चौथ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड)

इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने चांगली सुरुवात केली आणि जोफ्रा आर्चरच्या दोन सलग चेंडूवर चौकार व एक षटकार ठोकला. अशास्थितीत रोहित यंदा तरी मोठी खेळी खेळणार असे वाटत असतानाच जॅक लीचच्या चेंडूवर ओपनर बोल्ड होऊन माघारी परतला. यापूर्वी रोहित पहिल्या डावात 9 चेंडूत 6 धावाच करू शकला होता. त्यानंतर, दुसऱ्या डावात त्याचे संघासाठी खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकून राहणे महत्वाचे असताना तो स्वस्तात माघारी परतला. दरम्यान,सामन्याच्या अंतिम आणि निर्णायक दिवसाचा खेळ सुरु झाला असून असून भारतीय संघाला विजयासाठी तीनशेहून अधिक धावांची गरज आहे. पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

रोहितच्या जागी मयंक

मिम योग्य

हृदयभंग

रोहित रेड-बॉल क्रिकेटमध्ये 

मयंक अग्रवाल संधीचा पात्र

यापूर्वी, इंग्लंड खेळाडूंनी बॅटने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागत असताना दुसऱ्या डावात अश्विनसह अन्य गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. अश्विनने 3.49 च्या इकॉनॉमीने 6 विकेट घेतल्या आणि इंग्लंडला दुसऱ्या डावात 178 धावांवर गुंडाळलं.