IND vs ENG 1st Test Day 4: चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या चौथ्या टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) शानदार अर्धशतक झळकावले असून भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडच्या पहिल्या डावातील 241 धावांनी पिछाडीवर आहेत. टीम इंडियाने चौथ्या दिवशी झटपट 4 विकेट्स गमावल्या. सुंदर 85 धावा करून पहिल्या डावात नाबाद राहिला. दुसरीकडे, पाहुण्या संघासाठी पहिल्या सत्रात जॅक लीच (Jack Leech) आणि जेम्स अँडरसनला (James Anderson) प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. शिवाय, डोम बेस 4 आणि जोफ्रा आर्चरला 2 विकेट मिळाल्या. जो रूटच्या इंग्लंड संघाविरुद्ध पहिल्या डावात यजमान संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने 73, रविचंद्रन अश्विन 31 आणि शुभमन गिलने 29 धावांचे योगदान दिले. (IND vs ENG 1st Test 2021: पुढील सचिन तेंडुलकर! Rishabh Pant याची 'या' कारणामुळे होत आहे मास्टर-ब्लास्टरशी तुलना, पहा Tweets)
टीम इंडियाने चौथ्या दिवशी 6 बाद 257 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाचा डाव पुढे नेट सुंदरने 82 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. चौथ्या दिवसाच्या सावध सुरुवातीनंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. सुंदर आणि आर अश्विनमध्ये भागीदारी होत असताना भारतीय फिरकीपटू वैयक्तिक 31 धावांवर जॅक लीचचा शिकार बनला. शाहबाझ नदीम भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर जेम्स अँडरसनला पहिली विकेट मिळाली. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माला इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने झेलबाद करत माघारी धाडलं. इशांतने 11 चेंडूत 4 धावा केल्या. यापूर्वी, भारताकडून रोहित शर्माने 6, कर्णधार विराट कोहली 11 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 धाव करून स्वस्तात माघारी परतल्यामुळे संघ अडचणीत आला होता. पण, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला.
दुसरीकडे, इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात आला. संघाकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली तर डोमिनिक सिब्लीने 87 आणि बेन स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.