IND vs ENG 1st Test 2021: पुढील सचिन तेंडुलकर! Rishabh Pant याची 'या' कारणामुळे होत आहे मास्टर-ब्लास्टरशी तुलना, पहा Tweets
रिषभ पंत आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Instagram, PTI)

IND vs ENG 1st Test 2021: टीम इंडियाचा (Team India) युवा विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सद्य जबरदस्त लयीत दिसत आहे. ऑस्ट्रेलियामधील पहिल्या दोन कसोटी सामन्यात शानदार प्रदर्शन करत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नईच्या (Chennai) पहिल्या कसोटीत त्याने शानदार डाव खेळला मात्र, चाहत्यांमध्ये पंतबाबत दुसऱ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे ज्यामुळे आता त्याची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) तुलना होत आहे. पंतने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पहिल्या डावात शानदार डाव खेळला पण 91 धावांवर डोम बेसच्या (Dom Bess) चेंडूवर कॅच आऊट झाला आणि फक्त 9 धावांनी त्याचे टेस्ट शतक हुकले. ऑस्ट्रेलियामध्येही जेव्हा सिडनी कसोटी (Sydnet Test) सामन्यात तो 97 धावांवर माघारी परतला होता. इतकंच नाही तर यापूर्वीही तो मोठा डाव खेळण्यास अपयशी ठरला आहे. (IND vs ENG 1st Test Day 4: चेन्नईमध्ये टीम इंडियाची आज खरी 'कसोटी', इंग्लंडविरुद्ध फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज आहे, जाणून घ्या)

पंत इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 91 धावांवर माघारी परतला दुसरीकडे, त्याची सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना सुरु झाली. आणि ही तुलना सचिनच्या शानदार रेकॉर्डबाबत नसून एका अनपेक्षित विक्रमाशी होती. आपल्या कारकीर्दीत सचिन 90 हुन अधिकच्या धावसंख्येवर बाद झाल्यामुळे बर्‍याच वेळा चर्चेत राहिला होता. मास्टर-ब्लास्टर तब्बल 28 वेळा 'नर्व्हस 90'चा शिकार बनला आहे. तर रिषभ पंतही चौथ्यांदा नव्वदीपार शतक पूर्ण करण्यापासून काही धावांपूर्वी बाद झाला आहे. हे लक्षात येताच यूजर्सने अशा प्रतिक्रिया दिल्या.

पंत सचिनचा विक्रम मोडेल

सचिनच्या नर्व्हस 90चा वारस

पंतला सतत नव्वदीत बाद होताना पाहून सचिन

सचिन आणि सेहवाग यांचे मिश्रण..पंत!

सचिन संघर्षाला कोणी मात देऊ शकत नाही...!

दरम्यान, पंतने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा 50 हुन अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा शतक ठोकले, तर चार वेळा त्याचे शतक हुकले. पंतने मागील सात डावात नाबाद 159, 114, 97, 92, 92, 91 आणि नाबाद 89 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध पंतच्या पहिल्या डावात कामगिरी बद्दल बोलायचे तर त्याने 88 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावांचा तडाखेदार डाव खेळला. चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. दोंघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी झाली पण दोन्ही बाद झाल्याने भारताचा डाव गडगडताना दिसत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 578 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया अद्याप 273 धावांनी पिछाडीवर आहेत तर त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी 79 धावांची गरज आहे.