IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई (Chennai) येथील पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा (Team India) युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतची (Rishabh Pant) विकेटच्या मागे बडबड थांबेना. सामना सुरु असताना आपले साथीदार, विरोधी पक्ष आणि चाहत्यांचे मनोरंजन कसे करायचे हे युवा विकेटकीपर-फलंदाजाला चांगलेच माहित आहे. डॉम सिब्ली (Dom Sibley) आणि जो रूटची (Joe Root) जोडी मैदान गाजवत असताना चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंतने वॉशिंग्टन सुंदरबद्दल (Washington Sundar) केलेली एक मजेदार कमेंट स्टंप माइकमध्ये कैद झाली ज्यामुळे नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं. डावाच्या 70व्या वॉशिंग्टन सुंदरचा चेंडू डिफेन्ड करण्यात सिब्ली यशस्वी झाला. पंतने अष्टपैलू खेळाडूला ट्रोल करायला चांगली संधी मिळाली आणि म्हणाला की, "माझे नाव वॉशिंग्टन आहे, आणि मला डीसीला जायचे आहे." दरम्यान, पहिल्या दिवसावर इंग्लंड कर्णधार जो रूट आणि सलामी फलंदाज सिब्लीच्या द्विशतकी भागीदारीने वर्चस्व गाजवले. (IND vs ENG 1st Test Day 1: डॉम सिब्ली-जो रूट यांच्या फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाजांची शरणागती, पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा स्कोर 263/3)
रूट आणि सिब्ली यांच्यातील भागीदारीने शतकी टप्पा पार केल्याने भारतीय खेळाडूंची डोकेदुखी वाढवली. मैदानावर खेळाडूंनी चुका करण्यास सुरवात केली आणि हे तेव्हा पंतने आपल्या मजेदार अंदाजाने चाहत्यांचे व संघाचे मनोरंजन केले. या क्षणी, स्टंपच्या मागच्या बाजूला असलेल्या पंतने गोलंदाजाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आणि कविता करत विनोद केला. पंतची ही गमतीशीर कृती चाहत्यांना चांगलीच पसंत पडली आणि बघताच बघता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
"Mera naam hai Washington
Mujhe jana hai DC" - Rishabh Pant behind the stumps in Washington Sundar's over 😂😂#INDvENG#ViratKohli pic.twitter.com/9FoeXpLzRq
— बेरोजगार छात्र (@Souravpatel_17) February 5, 2021
दुसरीकडे, टीम इंडियाला पहिल्या दिवशी बॅकफूटवर नेट इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटने अंतिम दोन सत्र गाजवले तर भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी परिश्रम करावा लागला. रूटने सलग तिसरे तर भारताविरुद्ध दुसरे टेस्ट शतक झळकावले. डॉम सिब्लीनेही चांगली फलंदाजी केली. आता दुसऱ्या दिवशी रूटचा इंग्लंड संघ अधिकाधिक धावा करत यजमान संघावर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. चेपॉकची खेळपट्टी खेळाच्या उत्तरार्धात बरीच वळण घेणारी आहे आणि इंग्लंड संघाने 500 च्या जवळपास धावसंख्या गाठली तर भारतासाठी पुनरागमन करणे कठीण काम ठरू शकते.