इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई (Chennai) येथील पहिल्या टेस्ट सामन्यात इंग्लंड संघाने (England) यजमान टीम इंडियावर (Team India) 228 धावांनी मात करत सामन्यात विजय सलामी दिली आणि चार सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. एम. ए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या प्रत्युत्तरात सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला. संघासाठी शुभमन गिल (Shubman Gill) आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अंतिम दिवशी अर्धशतकी खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यास ती पुरेशी ठरली नाही. विराटने सर्वाधिक 72 तर शुभमनने 50 धावा केल्या. पुजाराने 15 आणि रिषभ पंतने 11 धावांचे योगदान दिले. यासह, भारतीय संघाला फेब्रुवारी 2017 नंतर घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इतकंच नाही तर चेन्नईच्या चेपॉक मैदानावर 22 वर्षानंतर टीम इंडियाचा पराभव झाला आहे. इंग्लंडसाठी जॅक लीच (Jack Leech) याने सार्वधिक 4 विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनला (James Anderson) 3, जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) 2 आणि डॉम बेस व बेन स्टोक्सला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसनचा ‘मास्टरक्लास’! Courtney Walsh यांना मागे टाकत इंग्लंड गोलंदाजाने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड)

शुभमन आणि विराटला वगळता एकही भारतीय फलंडनज मोठी खेळी करू शकला नाही. सलामी रोहित शर्मा 12 धावा करून माघारी परतला. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंड गोलंदाजांपुढे टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी  शरणागती पत्कारली. अशाप्रकारे संघाने फक्त 144 धावांवर 6 विकेट गमावल्या. शुभमनने विराटसह डाव पुढे नेत तिसरे कसोटी अर्धशतक ठोकले मात्र त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. दिवसाची सुरुवात भारताने 1 बाद 39 धावांनी केली. सलामीवीर गिल सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसत होता. टीम इंडियाच्या या युवा प्रतिभावान फलंदाजाने 81 चंदनुत आपल्या कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार कोहलीने झुंजार अर्धशतक लगावलं. पहिल्या डावात 34 धावा करणारा अश्विन दुसऱ्या डावात फक्त 9 धावाच करू शकला. एका बाजूने विकेट पडत असताना विराट मैदानावर टिकून खेळत होता या दरम्यान, विराटने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. यंदा, विराट आपल्या शतकाचा दुष्काळ संपवेल असे दिसत असताना स्टोक्सने कोहलीला 72 धावांवर क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं.

यापूर्वी, भारताला पहिल्या डावात 337 धावांवर गुंडाळल्याने इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडने या आघाडीसह दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली पण, या डावात भारतीय गोलंदाजांनी रोखले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला या डावात 40 हुन अधिक धावा करता आल्या नाहीत. कर्णधार जो रुटने सर्वाधिक 40 धावा केल्या आणि संघ दुसऱ्या डावात 178 धावांवर संपुष्ठात आला ज्यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान मिळालं. अश्विनने 6 इंग्लंड फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.