IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसनचा ‘मास्टरक्लास’! Courtney Walsh यांना मागे टाकत इंग्लंड गोलंदाजाने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंडचा जेम्स अँडरसन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) एक खास विश्वविक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन वयाची 30 वर्ष पार केल्यावर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) यांना मागे टाकले आहे. 30 वर्षांनंतर वॉल्शने एकूण 341 विकेट घेतले असून अँडरसनच्या नावावर आता 343 विकेट्स झाले आहेत. पहिल्या चेन्नई टेस्टच्या पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी अँडरसनने तीन विकेट्स घेऊन हा विक्रम केला. पाचव्या दिवशी अँडरसनने शुबमन गिल, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना बाद करून टीम इंडियाला अडचणीत टाकले. भारतीय फलंदाज अँडरसनच्या रिव्हर्स स्विंगपुढे ढेर झाले आणि स्वस्तात माघारी परतले. (IND vs ENG 1st Test Day 5: अँडरसनचा कहर; टीम इंडिया पराभवाच्या छायेत, लंचपर्यंत भारताच्या 6 बाद 144 धावा)

वयाची तिशी पार केल्यावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 287 बळी असून रिचर्ड हेडली चौथ्या क्रमांकावर आहेत. अँडरसन 38 वर्षाचा असला तरी त्याचा वेग अद्याप कमी झालेला नाही. इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील यशस्वी गोलंदाज अँडरसन आजही ज्या पद्धतीने गोलंदाजी करीत आहे, त्यावरून तो आणखी काही वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकेल असे दिसत आहे. अँडरसनची गोलंदाजी काळानुसार चांगली होत आहे. मे 2003 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजवर त्याने 158 सामन्यात एकूण 611 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, अंडरसन वयाची 30 वर्षे पूर्ण केल्यानंतर 300 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव सक्रिय वेगवान गोलंदाज आहे.

अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 600 किंवा अधिक विकेट घेणारा इंग्लडचा पहिला तर पहिला वेगवान गोलंदाज आहे. मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी 600 पेक्षा अधिक टेस्ट विकेट घेतल्या आहेत.