इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st T20I 2021: जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंड (England) संघाने 125 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 15.3 ओव्हरमध्ये 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेची विजयी सुरुवात केली. इंग्लंडकडून जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 49 धावा केल्या तर जोस बटलरने 28, जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) नाबाद 26 धावा आणि डेविड मलान (Dawid Malan) नाबाद 124 धावांचे योगदान दिले. भारतासाठी (India) युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा (Indian Team) आघाडीचा फलंदाजीक्रम गडगडल्यावर श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली, पण इंग्लिश खेळाडूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे यजमान संघ मोठी धावसंख्या गाठू शकली नाही परिणामी संघाला पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयसह इंग्लंड टीमने पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. (IND vs ENG 1st T20 2021: KL Rahul याची सुपरमॅन डायव्ह, बाउंड्री लाईनवर हवेत उडी घेत वाचवला सिक्स, व्हिडिओ पाहून तुम्हालाही व्हाल हैराण)

दरम्यान, श्रेयसची एकाकी झुंज वगळता भारताचे अन्य घातक खेळाडू अपयशी ठरले आणि संघाला 20 ओव्हरमध्ये फक्त 124 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रेयसने 48 चेंडूत 67 धावांची मोठी खेळी केली. यादरम्यन एक षटकार आणि 8 चौकार खेचले. इंग्लंडने सामन्यात टॉस जिंकून यजमान भारतीय संघाला पहिले बॅटिंगला बोलावलं, पण केएल राहुल 1 धावा, कर्णधार विराट कोहली शून्यवर तर शिखर धवन 4 धावा करून स्वस्तात माघारी परतले. यानंतर रिषभ पंत आणि अय्यरने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात पंत 21 धावा करून आऊट झाला. हार्दिकने 19 धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली. दुसरीकडे, इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर आदिल रशीद, मार्क वूड, क्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्स यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

दोन्ही संघातील पुढील सामना आता याच मैदानावर 14 मार्च रोजी खेळला जाईल. विशेष म्हणजे, यापूर्वी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशा फरकाने मालिका जिंकली आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.