केएल राहुलची सुपरमॅन उडी (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 1st T20 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) पहिल्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत यजमान टीम इंडियाने (Team India) पाहुण्या इंग्लंडला (England) विजयासाठी 125 धावांचं लक्ष्य दिल. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर भारताची स्थिती अवघ्या 20 धावांवर 3 बाद अशी झाली असताना श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला व संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. प्रत्युत्तरात जेसन रॉय आणि जोस बटलरची (Jos Buttler) जोडी इंग्लंडकडून सलामीला उतरली. यादरम्यान, इंग्लंडच्या बटलरने 5 धावांवर फलंदाजी करताना अक्षर पटेलच्या चेंडूवर जबरदस्त फटका खेळला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या केएल राहुलने (KL Rahul) हवेत ‘सुपरमॅन’सारखी उडी मारत षटकार अडवला. राहुलला बॅटने प्रभावित करता आले नसले तरी त्याने बाउंड्री लाईनवर आपल्या अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश केला. (IND vs ENG 1st T20I 2021: श्रेयस अय्यरची अर्धशतकी झुंज, इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान)

राहुलच्या अप्रतिम प्रयत्नाने बटलरला षटकार मिळाला नाही आणि फक्त 2 धावाच मिळाल्या. शिवाय, राहुलचे क्षेत्ररक्षणात प्रयत्न पाहून कर्णधार विराट कोहली, युजवेंद्र चहल यांनी टाळ्या वाजवून सलामी फलंदाजाचे कौतुक केले. अक्षरच्या चेंडूवर बटलरने जोरदार फटका मारला. हा चेंडू लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या राहुलने हवेत उडी घेत चेंडू अडवला. परंतु तो बाऊंड्रीच्या पलीकडे जाणार तेवढ्यात त्याने चेंडू मैदानात फेकला. इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने राहुलला सलामी फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. तथापि राहुल काही खास कामगिरी करू शकला नाही आणि एक धाव घेत पॅव्हिलियनमध्ये परतला. राहुलचा साथीदार शिखर धवनही स्वस्तात पॅवेलियनमध्ये परतला. राहुलला विशेषज्ञ फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेत राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला होता. अहमदाबाद येथील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि इयन मॉर्गनच्या पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. इंग्लंडने एकूण 20 धावांवर तीन विकेट्स घेल्या ज्यात राहुल, कोहली आणि धवनचा समावेश आहे.