IND vs ENG 1st T20I 2021: श्रेयस अय्यरची अर्धशतकी झुंज, इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान
श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड (England) संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात यजमान भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवून 124 धावा केल्या आणि इंग्लिश संघाला विजयासाठी 125 धावांचे माफक लक्ष्य दिले. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत इयन मॉर्गनच्या इंग्लिश संघाने धमाकेदार सुरुवात केली आणि टीम इंडियाला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. पहिल्याच सामन्यात आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर श्रेयस अय्यर (Shreys Iyer) आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अर्धशतकी भागीदारी करत संघाला आव्हानात्मक गाठून दिल्ली. श्रेयसने अर्धशतकी कामगिरी केली आणि 67 धावा केल्या तर हार्दिकने 19 धावांचे योगदान दिले. शिवाय, वॉशिंग्टन सुंदर 3 धावा आणि अक्षर पटेल 7 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर आदिल रशीद, बेन स्टोक्स, क्रिस जॉर्डन आणि मार्क वूड यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 1st T20I: वाह रे वाह! Rishabh Pant याच्या ‘त्या’ लाजबाव शॉटवर Netizens फिदा, पहा पंतचा अफलातून स्वीप सिक्सर)

इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या सलामीच्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली आणि अय्यर-पांड्याच्या जोडीने डाव सावरण्यापूर्वी यजमान संघाला तीन मोठे झटके दिले. रोहित शर्माला पहिल्या काही टी-20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याने धवन-राहुलची जोडी सलामीला उतरली मात्र आर्चरला आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये राहुलला 1 धावा करुन पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्यानंतर, रशीदने कर्णधार कोहलीला शून्यावर क्रिस जॉर्डनकडे झेलबाद केलं. विराट पाठोपाठ धवनही आऊट झाला आणि संघाला पॉवर-प्लेमध्ये तिसरा झटका बसला. अशाप्रकरे, टीम इंडियाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून अवघ्या 22 धावा केल्या. यानंतर, तडाखेदार बॅटिंग करत असलेला रिषभ पंतही खराब शॉट खेळत 21 धावा करून झेलबाद झाला. अखेर, श्रेयस आणि हार्दिकने 54 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. यांनतर, आर्चरने आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला सलग दोन धक्के दिले आणि पांड्यासह शार्दूल ठाकूरला स्वस्तात बाद केलं.

अय्यरने 36 चेंडूत टी-20 कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ठोकले. श्रेयसने आपल्या अर्धशतकी खेळी 8 चौकार आणि एक 1 षटकार खेचला. दरम्यान, अहमदाबादच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाने रोहितला विश्रांती दिली आहे तर  भुवनेश्वर कुमारचं आगमन झालं आहे.