IND vs ENG 1st T20I: वाह रे वाह! Rishabh Pant याच्या ‘त्या’ लाजबाव शॉटवर Netizens फिदा, पहा पंतचा अफलातून स्वीप सिक्सर (Watch Video)
रिषभ पंतचा रिव्हर्स स्वीप (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 1st T20I: टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) मागील कशी महिन्यांपासून बॅटने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामन्यानंतर टी-20 सामन्यात देखील त्याने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. सलामी फलंदाज केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरच्या पुढे पाठवलेल्या पंतने जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) चेंडूवर चौथ्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसनविरुद्ध (James Anderson) खेचलेल्या जबरदस्त षटकाराची पुनरावृत्ती केली आणि आर्चरच्या वेगवान चेंडूवर अप्रतिम षटकार ठोकला जे पाहून सामन्याचे समालोचकच नाही तर सोशल मीडियावर यूजर्स देखील फिदा झाले. शुक्रवारी आर्चरने टाकलेल्या चौथ्या षटकातील पेनल्टीमेट चेंडूवर पंतने मोठा फटका खेळला. पंतने शॉटची पूर्वसूचना दिली आणि कसोटी मालिकेत अँडरसनविरुद्ध त्याच्या धाडसी रिव्हर्स-स्वीपची चाहत्यांची आठवण करुन देत त्याने तिसर्‍या ओव्हरमध्ये षटकार ठोकला. (IND vs ENG 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यातून Rohit Sharma याला डच्चू, सोशल मीडियावर नेटकर्त्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया, पहा Tweets)

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात पंतने आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण करत 118 चेंडूत 101 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉस गमावून पहिले फलंदाजीसाठी आलेल्यानंतर भारताने आघाडीच्या तीन विकेट गमावल्या. डावाच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये आर्चरच्या गोलंदाजीवर राहुलचा त्रिफळा उडाला तर कर्णधार विराट आदिल रशीदच्या चेंडूवर शून्यावर माघारी परतला. नंतर, शिखर धवनला मार्क वुडने 4 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अशाप्रकारे यजमान टीम इंडियाने अवघ्या 20 धावांवर 3 विकेट गमावल्या.

पहा यूजर्सच्या प्रतिक्रिया

रिव्हर्स लॅप शॉट असतो!

पंतचा रिव्हर्स स्वीप

ऑफिशियल दिल्ली-स्कूप

अभूतपूर्व!

पंतच्या शॉटवर अँडरसन आर्चरला 

नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार कोहलीने उघड केले की सलामी फलंदाज रोहित शर्माला पहिल्या काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली असून राहुल-धवन जोडी सलामीला येईल. शिवाय, तब्बल 15 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमारने या सामन्यातून भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, इयन मॉर्गन इंग्लिश संघाचे नेतृत्व करत असून संघात सॅम कुरन, डेविड मलान, आदिल राशीद, क्रिस जॉर्डन यांचा सामावेश केला आहे. तसेच, जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलर यांनाही संधी मिळाली असली तरी बटलर विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळत आहे.