IND vs ENG 1st T20I 2021: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लिश संघाचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या सलामीच्या सामन्यासाठी यजमान टीम इंडिया (Team India) आणि मॉर्गनच्या इंग्लिश टीमने खतरनाक प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. भारताच्या (India) प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर शिखर धवनआणि केएल राहुलची जोडी सलामीला येईल तर रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल एकमेव फिरकीपटू आहे तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजी विभाग सांभाळतील. (IND vs ENG T20I Series: टीम इंडिया टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची सुवर्ण संधी, इंग्लंड मालिकेत फक्त करावे लागणार ‘हे’ काम)
दुसरीकडे, इंग्लंडसाठी जोस बटल आणि जेसन रॉयची जोडी सलामीला उतरेल. जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, कर्णधार मॉर्गन आणि बेन स्टोक्स मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी सांभाळतील. बटलर संघासाठी विकेटच्या मागे जबाबदारी सांभाळेल. मोईन अली, टॉम कुरन/क्रिस जॉर्डन यांना अष्टपैलू म्हणून स्थान दिले आहे. आदिल रशीद, सॅम कुरन आणि जोफ्रा आर्चर संघातील अन्य गोलंदाज आहेत.
पहिल्या टी-20 सामन्यासाठी असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.
टीम इंग्लंड: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर (विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर