विराट कोहली, पिंक बॉल (Photo Credit: Twitter/BCCI)

बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन्ही संघातील टेस्ट मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना इंदोर (Indore) च्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) मध्ये खेळला जाईल. पण  उत्सुकता आहे ती कोलकातामध्ये होणाऱ्या पहिल्या डे-नाईट टेस्टची. भारत (India) आणि बांग्लादेश संघाचा पहिला डे-नाईट सामना 22 ते 26 नोव्हेंबरमध्ये खेळला जाईल. भारतीय खेळाडूंना पिंक बॉलसह खेळण्याचा फारच कमी अनुभव असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने इंदोरमध्ये पिंक चेंडूसह सराव सत्र आयोजित केला होता. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या चेंडूंसह सराव करणारा पहिला फलंदाज होता. त्याने सुरुवातीचे काही चेंडू मिस केले, पण हे त्याला त्याचा ट्रेडमार्क कव्हर ड्राईव्ह शॉट खेळापासून रोखू शकला नाही. विराटशिवाय, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनीही पिंक बॉलने नेट्समध्ये सराव केला. दोन्ही फलंदाजांनी सावध पवित्रा घेत गुलाबी बॉलने सराव केला. (IND vs BAN 2019: इंदोर टेस्टआधी गल्ली क्रिकेट खेळताना दिसला विराट कोहली, पाहा Video)

बीसीसीआयने विराटच्या सरावाचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. एसजीने गेल्या शनिवार आणि रविवार रोजी गुलाबी बॉलची पहिली तुकडी बीसीसीआयला दिली होती. कसोटी सामना केवळ दोन्ही संघांसाठी पहिला डे-नाईट सामना होणार नाही तर एसजी गुलाबी बॉलचा पहिला अधिकृत सामना होईल. आजवर 11 डे-नाईट टेस्ट सामने खेळण्यात आले असून यांत कुकाबुर्रा आणि ड्यूक्स गुलाबी बॉलचा वापर करण्यात आला आहे. दुलीप ट्रॉफीच्या 2016-18 हंगामात भारतात वापरल्या गेलेल्या पिंक बॉलचे उत्पादनही कुकाबुरांनी केले होते. बांग्लादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट एसजी पिंक बॉलने खेळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच मालिकेसाठी दोन भिन्न बॉल वापरणे टाळण्याचे आहे.

विराट कोहली

पिंक बॉल

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, कसोटी तज्ञ पुजारा, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्यासह 22 नोव्हेंबरपासून बांग्लादेशविरूद्ध सुरू होणाऱ्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी होणाऱ्या पिंक बॉलच्या सराव सत्रात भाग घेतला. पिंक बॉलसह खेळण्याचा अनुभव शेअर करताना राहणे म्हणाला, "मी पहिल्यांदाच पिंक बॉलबरोबर खेळत होतो आणि रेड बॉलपेक्षा हा वेगळा सामना निश्चितच होता. आमचे लक्ष 'स्विंग अँड सीम'च्या मुमेंटवर होते आणि त्याचवेळी आम्ही आपल्या शरीराच्या जवळपास खेळण्यावर लक्ष केंद्रित केले होते."