भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा समवेत भूतानमध्ये सुटी घालवून अल्प विश्रांतीनंतर परतला आहे. कोहलीने आपला 31 वा वाढदिवसही भूतानमध्येच साजरा केला होता. आता विराट परतला आहे आणि त्याने 14 नोव्हेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध इंदोरमध्ये सुरू होणाऱ्या टेस्ट सामन्यासाठी तयारीही सुरू केली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. आता सर्वांच्या नजरा कसोटी मालिकांकडे लागल्या आहेत. याआधी विराट इंदोरच्या रस्त्यावर फलंदाजी करताना दिसला. कोहलीला बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. पण, आता विराट टेस्ट मालिकेसाठी संघात दाखल झाला आहे. संघाने इंदोरमध्ये या मॅचसाठी केली आहे. या दरम्यान कोहली इंदोरच्या रस्त्यावर मुलांसमवेत क्रिकेट खेळताना दिसला. विराटचा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. (India vs Bangladesh: कोलकाता येथे दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेत खेळला जाईल पहिला डे-नाईट टेस्ट सामना- BCCI)
या व्हिडिओमध्ये विराट फलंदाजी करताना दिसत आहे. कर्णधार विराट आपल्या चाहत्यांसह मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका निवासी कॉलनीत क्रिकेट खेळताना दिसला आणि यावेळी त्याने खूप मजा केली. बातमीनुसार कोहली बीचोली-मर्दाना येथील श्रीजीवेली कॉलनीत शूटिंगसाठी आला होता. शूटिंगनंतर कोहली इथल्या मुलांसमवेत क्रिकेट खेळला. यादरम्यान त्याने आपल्या चाहत्यांसमवेत सेल्फीही घेतली. कोहलीला पहाण्यासाठी थोड्याच वेळात अनेक लोकं इथे जमले. पाहा व्हिडिओ:
बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिकेपूर्वी टीम इंडिया सराव सत्रात भाग घेत आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. या स्पर्धेत भारताने आजवर पाच सामने खेळले असून सर्व सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, बांग्लादेश आयसीसी या मालिकेसह टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात करणार आहे. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात विराटने 147 धावा केल्या तर तो सहाव्या क्रमांकावर असलेल्या सौरव गांगुली याला सर्वाधिक टेस्ट धावांच्या यादीत मागे टाकेल.