
दिल्लीमधील भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 मॅचवर प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला होता, पण सामना कोणत्याही विघ्नविना संपुष्टात आला. या सामन्याबद्दल लिटल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बर्याच मोठ्या गोष्टी बोलल्या आहेत. गावस्कर यांनी 'आज तक' ला सांगितले की, "भारतीय संघाने (Indian Team) पहिला टी-20 सामना विसरू नये. या सामन्यातून संघाने शिकले पाहिजे. गावस्करला वाटते की सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने लवकरच आपला फॉर्म पुन्हा शोधायला हवा. शिखरला जगातील सर्वात शक्तिशाली व्हाईट बॉल फलंदाज मानले जाते. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान धवनला दुखापत झाली होती यानंतर त्याला मागील सामन्यांमंध्ये संघर्ष करताना पहिले गेले. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात धवनने 42 चेंडूत 41 धावांची खेळी केली. (IND vs BAN 2nd T20I: प्रदूषणानंतर भारत-बांग्लादेश मॅचवर आता 'Maha' Cyclone चे सावट, सामना रद्द होण्याची शक्यता)
धवनच्या या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करत बांग्लादेशविरुद्ध पुढील दोन मॅचमध्ये त्याला सर्वोत्तम प्रदर्शन करता आले नाही तर लोकं बोलू लागतील असे गावस्कर यांनी सांगितले. “पुढील दोन सामन्यांमध्ये शिखर धवन जर चांगली फलंदाजी केली नाही तर प्रश्न उपस्थित होतील. समान बॉलमधून 40-45 धावा केल्याचा संघाला काही फायदा होणार नाही. याचा त्याला विचार करावा लागेल. काही काळानंतर खेळाडू पुनरागमन करतो तेव्हा त्याला फॉर्म परत मिळविण्यात बराच वेळ लागतो,” गावस्कर म्हणाले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करावी लागेल, असेही गावस्कर म्हणाले. भारतीय संघ साध्य टी-20 मध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. "आयसीसी रँकिंगमध्ये भारत 5 व्या स्थानावर आहे. जर ते 2/3 वर गेले तर त्यांना काही मोठे सामने जिंकावे लागतील. आणि जर ते हे करू शकत नसेल तर (टी -20) विश्वचषक जिंकणे त्यांच्यासाठी सोपे नाही, ”असे गावस्कर पुढे म्हणाले.
आता दोन्ही संघ राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर दुसरा सामना खेळतील. बांग्लादेश संघाने मागील सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे, भारतासाठी मालिकेत बनून राहण्यासाठी पुढील सामना जिंकणे महत्वाचे आहे. मागील सामना जिंकत बांग्लादेशने टीम इंडियाविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली होती. 1000 व्याआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात बांग्लादेशने अष्टपैलू कामगिरी करत भारताला 7 विकेट्सने पराभूत केले होते.