भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. रविवारी (3 नोव्हेंबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) वर मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दिल्लीतील हवेची पात्रता खालावल्याने या सामन्यावर धोका निर्माण झाला होता आणि सतत वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सामन्याची रद्द करण्याच्या चर्चादेखील जोरावर होत्या. पण, हा सामना निर्धारित वेळेवर खेळला गेला आणि भारताला पहिल्यांदा टी-20 मध्ये पराभूत करत बांग्लादेशने 7 विकेटने विकेट मिळवला. आता दोन्ही संघातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 7 नोव्हेंबरला राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Assosiation) स्टेडियमवर खेळला जाणार असून आणि हा सामन्यांवरही संकटाचे सावट बनले आहे. या सामन्यादरम्यान 'महा'(Maha) नावाचे वादळ शहरात कहर आणू शकते. (बांग्लादेशविरुद्ध DRS संधर्भात पुन्हा रिषभ पंत याने घेतला चुकीचा निर्णय, रोहित शर्मा याने मारला कपाळाला हात, पाहा Video)
दिल्लीतील सामना जिंकून बांग्लादेश संघाने या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि पहिल्यांदा टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर संघ पोहचला आहे. 'महा' चक्रीवादळामुळे रोजकोटमध्ये खेळलेल्या संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रामध्ये तीव्र चक्रीवादळ वादळ 'महा' बुधवार 6 नोव्हेंबर रोजी गुजरात किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. केरळच्या किनाऱ्यावरील भारतीय समुद्रात येत्या 2 दिवसांत मोठे वादळ येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या विनाशकारी वादळामुळे गुजरात, पोरबंदर, सोमनाथ, जुनागड आणि देवभूमी द्वारका किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक आयएमडीचे संचालक जयंता सरकार म्हणाले की, "चक्रीवादळ 'महा' बुधवार रात्री किंवा गुरुवारी सकाळपर्यंत द्वारका आणि दीववर धडक देऊ शकेल. या वादळामुळे 6 ते 7 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे." भारत-बांग्लादेश संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 7 नोव्हेंबरला खेळवला जाणार असून जोरदार पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो. भाष्यकार हर्षा भोगले यांनीही ट्विटरवर या वादळाचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, भारतीय संघाने पहिला सामना गमावला आहे आणि मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांचा दुसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. आणि पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाच्या मालिका जिंकण्याच्या आशाही संपुष्टात येतील. 10 नोव्हेंबरला नागपूरमध्ये तिसरा सामना जिंकून भारत मालिका बरोबरीत आणून ड्रॉ करू शकतो.