बांग्लादेशविरुद्ध DRS संधर्भात पुन्हा रिषभ पंत याने घेतला चुकीचा निर्णय, रोहित शर्मा याने मारला कपाळाला हात, पाहा Video
(Photo Credit: Twitter)

भारत (India)-बांगलादेश (Bangladesh) संघात दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान रिषभ पंत (Rishabh Pant) याचे विकेटकिपिंग कौशल्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. बांग्लादेशच्या डावातील एका ओव्हरमध्ये पंतने 3 चुका केल्या. तो केवळ बॉल योग्यरित्या पकडण्यात अपयशी ठरला नाही तर डीआरएस (DRS) मध्येही तो अपयशी ठरला. आजच्या मॅचमध्ये बांग्लादेशने भारताविरुद्ध खूप चांगले प्रदर्शन केले. दिल्लीत बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पंतने पुन्हा डीआरएसबाबत मोठी चूक केली आहे. विकेटच्या मागे झेल घेण्याच्या आवाहनावर डीआरएस घेण्याच्या आग्रहामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालासुद्धा हसू अनावर झाले. ही चूक भारताला महागात पडली आणि मुशफिकुर रहीम याने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि भारताकडून हा सामना खेचून नेला. (IND vs BAN 1st T20I: शिखर धवन याला Run-Out करण्यावरून रिषभ पंत याला Netizens ने केले ट्रोल, पाहा Tweets)

बांग्लादेशच्या डावाच्या दहाव्या षटकातील शेवटचा चेंडू सौम्य सरकार (Soumya Sarkar) खेळण्यास चुकला. पण यष्टीरक्षक पंतने झेलबादसाठी अपील केली ज्यास पंचांनी नॉटआऊट म्हटले. पण, पंतच्या आग्रहावरून रोहितने डीआरएस घेण्याचे ठरविले. पण, रिव्यूमध्ये पाहिल्यानंतर चेंडू बॅटला लागला नसल्याचे समोर आले. यानंतर रोहितने डोक्यावर हात ठेवून हावभाव केला आणि असे वाटले की तो म्हणतोय, 'तू काय करतो?'. महेंद्र सिंह धोनी याच्याकडे डीआरएसच्या बाबतीत कौशल्य आहे. याच कारणास्तव डीआरएसला सोशल मीडियावर धोनी रिव्ह्यू सिस्टम देखील म्हटले जात आहे. पाहा पंतच्या चुकीवर रोहितची भन्नाट प्रतिक्रिया:

या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. शिखर धवन याने हळू-हळू पण सावध फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाने 20 ओव्हर 6 गडी गमावून 148 धावा केल्या. धवनने 42 चेंडूत 41 धावा केल्या.याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने 19.3 ओव्हरमध्ये 7 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या आजच्यावरच्या टी-20 सामन्यातील बांग्लादेशचा हा पहिला विजय आहे.