IND vs BAN 1st T20I: शिखर धवन याला Run-Out करण्यावरून रिषभ पंत याला Netizens ने केले ट्रोल, पाहा Tweets
रिषभ पंत, शिखर धवन (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात सध्या दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत बांग्लादेशी संघाची आपले वर्चस्व कायम ठेवत भारतीय संघाला मुश्किलीत पडले. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला मोठा धक्का देत शफीउल इस्लाम याने कर्णधार रोहित शर्मा याला एलबीडब्ल्यू आऊट केले. रोहितने 9 धावा केल्या. यानंतर के एल राहुल आणि श्रेयस अय्यर हेदेखील प्रभावी कामगिरी करू शकने नाही. आणि अनुक्रमे 15 आणि 22 धावांवर अमिनुल इस्लाम याच्या गोलंदाजवर झेलबाद झाले असताना धावा करण्याची जबाबदारी आता एकट्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यावर आली. एका टोकाला विकेट पाडण्याचे सत्र सुरु होते, तर दुसरीकडे शिखर सावध फलंदाजी करत होता. तीन गडी बाद झाल्यावर रिषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजीसाठी मैदानावर आला. (IND vs BAN 1st T20I: शिखर धवन याची एकाकी झुंज, बांग्लादेश संघाला विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य)

पंत आणि धवनने फलंदाजी करत कोणताही जोखीम घेतली नाही आणि धावांचा दर सहाच्या खाली जाऊ नये याची खात्री केली. दोघांमधील भागीदारी चांगली सुरु होती आणि संघ मोठी धावसंख्या करेल अशी आशाही निर्माण झाली. पण, पंतने 15 व्या  ओव्हरमध्ये गंभीर चूक केली ज्यामुळे भारताला काही महत्त्वपूर्ण विकेट गमवावी लागली. ओव्हरची पाचवी बॉल पंतने हळुवारपणे लेग-साईडला मारली आणि एक धाव घेण्यासाठी धावला. गोलंदाज महमूदुल्लाह चेंडूच्या मागे धावला आणि यादरम्यान शिखरही दुसरी धाव घेण्यासाठी परतला. पण, बांग्लादेशी कर्णधाराने स्फूर्ती दाखवत बॉल विकेटकीपरकडे फेकला आणि त्याने कोणतीही चूक न करता बेल्स उडवल्या आणि धवनला माघारी धाडले. पंतच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर यूजर्सने पंतवर टीका केली तर काहींनी त्याला ट्रोल केले.

पहा पंतच्या एका चुकीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

पंतने आजसाठी आपले काम आधीच केले आहे.

शिखर धवन छान खेळत असताना त्याला धावबाद करण्यामध्ये मोठे योगदान

हास्यास्पद! 

पंत का खेळवायचे? खराब खेळाडू.

बांग्लादेशने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी सुरुवातीपासून अनुभवी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले होते. निर्धारित 20 ओव्हरमध्ये भारताने बांग्लादेशला विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य दिले आहेत. धवनने 44, तर पंतने 27 धावांची महत्वाची खेळी केली.