रोहित शर्मा आणि महमदुल्लाह (Photo Credits: Getty Images)  

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. बांग्लादेशने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतली आणि गोलंदाजांनी कर्णधार महमूदुल्लाह याच्या निर्णयाला योग्य सिद्ध केले. गोलंदाजांनी सुरुवातीपासून अनुभवी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले होते. निर्धारित 20 ओव्हरमध्ये भारताने 6 बाद 148 धावा केल्या. आणि आता बांग्लादेशला भारतविरुद्ध पहिल्या टी-20 विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. भारताकडून सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वाधिक धावा केल्या. धवनने एकाकी झुंज देत संघाला चांगला स्कोर करून देण्यास महत्वाची भूमिका बजावली. रिषभ पंत 27 धावांवर झेल बाद झाला. दरम्यान, बांग्लादेशकडून शफीउल इस्लाम (Shafiul Islam) आणि अमीनुल इस्लाम (Aminul Islam) याने 2 गडी बाद केले, आफिफ हुसेन (Afif Hossain) याला 1 विकेट मिळाली. (IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याने हिसकावून घेतले विराट कोहली याचे No 1 स्थान, पुन्हा नोंदवला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड)

टॉस जिंकून बांग्लादेशने भारताला पहिले बॅटिंग करण्याचे निमंत्रम दिले. कर्णधार रोहित शर्मा याने सुरुवातीला दोन चौकार मारले पण, त्याला त्याचा फॉर्म कायम ठेवता आला नाही. शफीउल इस्लाम याने रोहितले 9 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. याच्यानंतर शिखर एकाबाजूने टिकून फलंदाजी करत होता, तर दुसऱ्या टोकाला विकेट पाडण्याचे सत्र सुरूच होता. के एल राहुल 15. श्रेयस अय्यर 22 धावांवर बाद झाला आणि धवनवर दबाव बनत गेला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंत याने धवनला साथ दिली. पण, एका गैरसमजमुळे धवन रनआऊट झाला. धवनने 41 धावांची खेळी केली. धवन बाद झाल्यावर पंत सावध फलंदाज करत राहिला. कृणाल पंड्या याने त्याला चांगली साठी दिली. आजच्या मॅचमध्ये एकीकडे अन्य भारतीय फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसले, तिथे शिखरने सावंत खेळी करत टीमसाठी महत्वाची भूमिका बजावली. कृणाल पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये काही मोठे शॉट्स खेळले. कृणाल 15, तर सुंदर 14 धावांवर नाबाद राहिले.

भारत आणि बांग्लादेशमध्ये आजवर 8 टी-20 सामने झाले आहेत आणि या सर्वांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे, आजच्या मॅचमध्ये ही समीकरणे बदलतील की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.