रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) याच्यात झालेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर त्याला मैदानातूनच शिवी दिली. याच्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत आणि बांग्लादेश संघातील दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने पहिले बॅटिंग करत टीम इंडियाला 154 धावांचे लक्ष्य दिले. पहिले बॅटिंग करताना बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली, पण नंतर त्यांचे विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. या मालिकेतील दुसरा सामना राजकोटमध्ये खेळला गेला, यात भारताने आठ विकेट्सने विजय मिळविला. बांगलादेशच्या डावादरम्यान रोहित थर्ड अंपायरला शिवीगाळ करताना दिसला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. (IND vs BAN 2nd T20I 2019: राजकोटमध्ये रोहित शर्मा नावाचे 'महा' वादळ, एका मॅचमध्ये मोडले 'हे' रिकॉर्ड)

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) डावाच्या 13 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर बांग्लादेशी फलंदाज सौम्य सरकार (Soumya Sarkar) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू चुकला. यानंतर रिषभ पंत याने मागे झालेली चूक सुधारत त्याने ग्लोव्हसला सावधगिरीने स्टंपच्या मागे ठेवत स्टॅम्पिंग केले. मात्र, थर्ड अंपायरने यावेळी पंतच्या चुकीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये पंतचे ग्लोव्हज स्टम्पच्या मागे स्पष्ट दिसत होते आणि सौम्या सरकार आउट होते. तथापि, थर्ड अंपायरने व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकून पडद्यावरील नॉट आऊट बटण दाबले. अशा परिस्थितीत रोहितने थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय पडद्यावर पाहताच त्याचे हात पडद्यावर उठले आणि व्हिडिओ पाहून हे समजले की तो त्यांना शिवीगाळ करत आहे. मात्र, नंतर पंचांनी आपली चूक सुधारली आणि पडद्यावरील आऊट बटण दाबल्यानंतर सौम्यला बाद केले. या घटनेनंतर रोहितचा हा व्हिडिओ आगीसारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारताने घेतला. बांग्लादेशने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 153 धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल भारताने 15.4 ओव्हरमध्ये 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने 43 चेंडूत 85 धावांची दमदार खेळी केली आणि यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही त्याला निवडण्यात आले.