
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध राजकोटच्या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा 100 वा सामना खेळला आणि तो त्याने संस्मरणीय बनविला. 100 टी-20 सामने खेळणारा रोहित भारताचा पहिला पुरुष क्रिकेटपटू, तर विश्वातील दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी, पाकिस्तान संघाचा अष्टपैलू शोएब मलिक (Shoaib Malik) याने सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा रेकॉर्ड केला आहे. शोएबने 111 टी-20 सामने खेळले आहेत. 100 व्या आंतरराष्ट्रीयटी-20 सामन्यात रोहितने 85 धावांची तुफानी खेळी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. टी -20 क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितचा संघ पहिल्यांदा बांग्लादेशकडून पराभूत झाला होता, पण दुसर्या सामन्यात रोहितने बांग्लादेशला पराभूत करत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. (IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा याची शानदार फलंदाजी; 8 विकेटने विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने केली बरोबरी)
या सामन्यात कर्णधार रोहितने 43 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारांसह 85 धावा केल्या. या वादळी खेळीमुळे रोहितने आपला 100 वा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना यादगार बनवला. आया मॅचपूर्वी राजकोटला 'महा' (Maha) नावाच्या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचे म्हटले जात होते. पण सामन्याच्या दिवशी या वादळाची तीव्रता कमी झाली. हे वादळ तर गुजरातमध्ये आले नाही, रोहितने त्याच्या खेळीने वादळ नक्की आणले. रोहितने 85 धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. जाणून घ्या:
1. रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची सलामी जोडी संध्या क्रिकेट विश्वातील यशस्वी जोडींपैकी एक आहे. बांग्लादेशविरुद्ध दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. एकीकडे रोहितने 85 धावा केल्या, तर शिखरने त्याला चांगली साथ देत 31 धावा केल्या. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. टी-20 मध्ये सर्वाधिक भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आता या जोडीने आपल्या नावावर केला आहे. दोन्ही खेळाडूंनी चौथ्यांदा टी-20 मध्ये 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांच्या नावावर होता. दोंघांमध्ये तीनदा शतकी भागीदारी झाल्या आहेत.
2. राजकोट टी-20 मध्ये रोहितने 72 धावा करत सुरेश रैना याला पिछाडीवर टाकले. टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली सध्या भारताकडून प्रथम क्रमांकावर आहे. रैनाने 8392टी-20धावा केल्या आहेत. आजच्या खेळीसह 8,406 धावा करतरोहित भारताकडून सर्वाधिक टी-20 धावा करणऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
3. रोहितने या मॅचमध्ये 85 धावांच्या खेळीत 6 षटकार आणि तितकेच चौकारही मारले. रोहितने यासह एका वर्षात 66 षटकार मारले आहेत.
4. आजच्या सामन्यात रोहितने 24 धावा करत रोहितने 2019 मध्ये त्याच्या 2000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहितने यावर्षी क्रिकेटच्या वनडे, टेस्ट आणि टी-20 मध्ये 54.88 च्या सरासरीने 1976 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यासह रोहितने यंदाच्या वर्षात 2,061 धावा केल्या आहेत.
5.48 धावा करत टी-20 मध्ये 2500 धावा करणारा रोहित पहिला फलंदाज बनला आहे. इतकेच नाही तर, टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रोहितने आपल्या नावावर केले. आजचा सामना लक्षात घेत रोहितने 100 सामन्यात 2537 धावा केल्या आहेत.
6. रोहितने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. रोहितने आजवर बांग्लादेशविरुद्ध 450 धावांची नोंद केली आहे. रोहितच्या अगोदर झिम्बाब्वेचा फलंदाज हॅमिल्टन मस्कादझा याने 377 आणि कुसल परेरा याने 365 धावा केल्या होत्या.
रोहितने 23 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान हिटमॅनचा स्ट्राइक रेट 230 पेक्षा जास्त होता. रोहितने त्याच्या दमदार शैलीत षटकार मारत आपले 18 वे अर्धशतक पूर्ण केले. दोन्ही संघातील पुढील सामना आता रविवारी, 10 नोव्हेंबरला नागपूरमध्ये खेळवला जाईल.