भारत विरुद्ध बांगलादेश (Photo Credit - File)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी भारताकडून रविचंद्रन अश्विनने झटपट शतक झळकावले. अश्विनने 108 चेंडूत कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. ज्यामध्ये 10 चौकार आणि 2 षटकार मारले होते. याशिवाय रवींद्र जडेजा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावली.

भारताची नजर मोठ्या धावसंख्येकडे

सध्या भारताकडून रवींद्र जडेजा 117 चेंडूत नाबाद 86 धावा करत असून रविचंद्रन अश्विन 112 चेंडूत नाबाद 102 धावा करत आहे. तर बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दुसरा दिवस खूपच रोमांचक असेल, भारताची नजर मोठ्या धावसंख्येकडे असेल.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा आनंद तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमावर मोबाईलवर पाहता येईल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.