ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 आज (शनिवार, 18 जानेवारी) पासून सुरू होत आहे, ज्यामध्ये 16 संघ सहभागी होत आहेत. भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार, 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल. 2023 मध्ये इंग्लंडला हरवून भारत विजेता बनला आणि गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होत आहे.
Presenting the ICC U19 Women's T20 World Cup 2025 fixtures 🤩#U19WorldCup | More ➡️ https://t.co/A8MfiyM77B pic.twitter.com/ssRAsUGrHy
— ICC (@ICC) August 19, 2024
ग्रुप बी मध्ये इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. गट क मध्ये न्यूझीलंड, नायजेरिया, सामोआ आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. ग्रुप स्टेजचे सामने 23 जानेवारीपर्यंत खेळवले जातील, त्यानंतर सुपर सिक्सचे सामने 25 जानेवारीपासून सुरू होतील. यानंतर, उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारी रोजी खेळवले जातील आणि त्यानंतर अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरमधील बेयुमास ओव्हल येथे होईल.
भारतात कुठे पाहणार सामन्याचे थेट प्रेक्षेपण
2025 च्या अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकातील सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8.00 आणि दुपारी 12.00 वाजता सुरू होतील. तसेच अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकाचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सर्व सामने स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी) आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी) वर प्रसारित केले जातील.
अंडर 19 महिला भारतीय संघ
भारत: निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चालके, जी त्रिशा, कमलिनी जी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी दृथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.