WPL 2024 (Photo Credit - X)

WPL 2025: 4 शहरे, 5 संघ आणि 22 रोमांचक सामने... महिला खेळाडूंसाठीचा हा मेगा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या नवीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेचा पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे खेळला जाईल, तर या मेगा स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना 15 मार्च रोजी मुंबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात जायंट्सशी होईल. पाचही संघांमधील सर्व रोमांचक सामने संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवले जातील. या सामन्यापूर्वी, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाच संघांचा संपूर्ण संघ येथे पहा.

मुंबई इंडियन्स संघ (Mumbai Indians Squad)

अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, जिंतीमणी कलिता, सत्यमूर्ती कीर्तना, नताली सायव्हर, पूजा वस्त्रकर, सजीवन सजना, यास्तिका भाटिया, सायका इशाक, शबनीम इस्माइल, नदीन डी क्लार्क, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (Royal Challengers Bengaluru Squad)

डॅनी व्याट-हॉज, सब्बिनेनी मेघना, स्मृती मानधना, आशा शोबाना, एलिस पेरी, जॉर्जिया वेअरहॅम, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, सोफी डेव्हाईन, रिचा घोष, रेणुका सिंग, एकता बिश्त, केट क्रॉस, चार्ली डीन, प्रमिला रावत, व्हीजे जोशिता, राघवी बिस्ट, जागरवी पवार.

हे देखील वाचा: BCCI New 10 Rules: देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य, वैयक्तिक शूटिंगवरही बंदी; बीसीसीआयने खेळाडूंसाठी लादले 10 कडक निर्बंध

दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals Squad)

जेमिमा रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग, शफाली वर्मा, स्नेहा दीप्ती, अॅलिस कॅप्सी, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मॅरिझाने कॅप, मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया, तितस साधू, श्री चरणी, नंदिनी कश्यप, सारा ब्राइस , निक्की प्रसाद.

गुजरात जायंट्स संघ (Gujarat Giants Squad)

भारती फुलमाली, लॉरा वोल्वार्ड्ट, फोबी लिचफिल्ड, प्रिया मिश्रा, अ‍ॅशले गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, सायली सतघरे, तनुजा कंवर, बेथ मुनी, शबनम शकील, मन्नत कश्यप, मेघना सिंग, काशवी गौतम, डिएंड्रा डॉटिन, सिमरन शेख, डॅनियल गिब्सन , प्रकाशिका नाईक.

यूपी वॉरियर्स संघ (UP Warriorz Squad)

किरण नवगिरे, श्वेता सहरावत, वृंदा दिनेश, चामारी अथापथू, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्राथ, उमा छेत्री, एलिसा हिली, साईमा ठाकोर, गौहर सुलताना, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, आरुषी गोयल, क्रांती गौर, अलाना किंग.