IND vs AUS Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 भारतीय फलंदाजांनी ठोकले आहे दुहेरी शतक, व्हीव्हीएस लक्ष्मणने खेळला सर्वात मोठा वैयक्तिक डाव

IND vs AUS 2020-21 Series: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील कसोटी मालिका नेहमीच उत्साहवर्धक राहिली आहे आणि कांगारू संघाविरुद्ध खेळणे टीम इंडियासाठी (Team India) कधीच सोपे राहिले नाही. ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच एक मजबूत प्रतिस्पर्धी राहिला आहे आणि वेगवेगळ्या काळात धोकादायक गोलंदाज संघातराहिले आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध धावा करणे ही मोठी उप्लाब्दी मानली जाते. टीम इंडिया पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, परंतु त्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये या संघाविरुद्ध कोणत्या भारतीय फलंदाजाने भारतासाठी सर्वात मोठा वैयक्तिक डाव खेळला आहे त्याबद्दल जाणून घेऊया. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबर रोजी कसोटी मालिका खेळली जाईल, तर 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (VVS Laxman) नावावर आहे. (भारतीय क्रिकेटपटूंचे हे अनोखे 5 वर्ल्ड रेकॉर्ड्स जे कदाचितच तुम्हाला माहिती असतील, जाणून व्हाल आश्चर्यचकित)

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2001 कोलकाताच्या इडन गार्डनवरील सामना क्रिकेट चाहत्यांना कधीच न विसरणार आहे. भारताच्या त्या ऐतिहासिक विजयात लक्ष्मणने सर्वाधिक 281 धावांचा डाव खेळला होता आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. कसोटी सामन्यात कांगारू संघाविरुद्ध लक्ष्मणचा हा डाव टीम इंडियाकडून सर्वात मोठा वैयक्तिक डाव ठरला असून हा विक्रम अद्याप अबाधित आहे. इतकंच नाही तर तर लक्ष्मण वगळता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघातील काही खेळाडूंनी द्विशतकी डाव खेळला आहे. यातील एका खेळाडूचा पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकण्याचा मान भारताकडून केवळ पाच फलंदाजांनी मिळविला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 241 धावा केल्या होत्या तर राहुल द्रविडनेही कांगारू संघाविरुद्ध दुहेरी शतक झळकावत 233 धावांचा धावा खेळला आहे. दुसरीकडे, यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या पुजाराने या संघाविरुद्ध 204 धावा केल्या होत्या. धोनीनेही कांगारू संघाविरुद्ध दुहेरी शतक झळकावले असून 224 धावांची खेळी केली आहे.