IND vs AUS 3rd ODI: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तिसर्या वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले. या सामन्यात यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणार्या गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतीय घरगुती सामना आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या खेळीने प्रभावित केलेल्या टी नटराजनला (T Natarajan) 2 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा (Canberra) येथे खेळल्या गेलेल्या मालिकेचा तिसरा सामना गोलंदाज नटराजनसाठी संस्मरणीय ठरला. या सामन्यात त्याला प्रथमच भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळाली. नवदीप सैनीचा बॅक अप गोलंदाज म्हणून नटराजनचा एकदिवसीय संघात (Natarajan ODI Debut) समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळणारा तो 232 वा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू करत नटराजनने खास यादीत आपले नाव सामील केले आहे. (IND vs AUS 3rd ODI: कॅनबेरामध्ये हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांचे धमाकेदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत टीम इंडियाची 302 धावांपर्यंत मजल)
ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात करणारा नटराजन मागील चार वर्षातील चौथा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करणाऱ्या शेवटच्या चार खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज, अष्टपैलू विजय शंकर यांचा समावेश आहे. या यादीमध्ये आता यॉर्कर किंग टी नटराजन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 2016मध्ये बुमराह तर 2019 मध्ये सिराज आणि विजय शंकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे, हे चारही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज असून चौघांनी ऑस्ट्रेलियातील चार वेगवेगळ्या मैदानात वनडे पदार्पण केले आहे. बुमराहने 2016 मध्ये सिडनी येथे वनडे पदार्पण केले होते तर सिराजने अॅडिलेड येथे 2019 तसेच विजय शंकरनेही सन 2019 मध्येच मेलबर्न येथे वनडे पदार्पण केले होते.
A massive day for @Natarajan_91 today as he makes his #TeamIndia debut. He becomes the proud owner of 🧢 232. Go out and give your best, champ! #AUSvIND pic.twitter.com/YtXD3Nn9pz
— BCCI (@BCCI) December 2, 2020
इतकंच नाही तर यापूर्वी, इरफान पठाण, व्हीव्हीस लक्ष्मण आणि इशांत शर्मा यांनीही ऑस्ट्रेलियामध्ये वनडे/कसोटी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. इरफानने 2004 व्हीबी मालिका, इशांत 2008 सीबी मालिका तर लक्ष्मणने 1999/2000 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात केली.