टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आज 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामन्यासाठी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमने-सामने असतील. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने तीस जिंकला आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आजचा सामना दोन्ही टीम्ससाठी महत्वाचा आहे. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. आजच्या सामन्यासाठी यजमान संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र, निर्णायक सामना लक्षात घेत ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) जागी जोश हेजलवुडचा (Josh Hazlewood) समावेश झाला आहे. आजच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया प्रभावी खेळ करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहावी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा पलटवार करू पाहिलं. ऑस्ट्रेलियाने मुंबईमधील सामन्यात भारताला 10 विकेटने पराभूत केले, तर राजकोटमध्ये टीम इंडियाने 36 धावांनी विजय मिळविला. आजच्या सामन्यात जो संघ विजय होईल तो मालिका ही जिंकेल.
टीम इंडियासाठी संतोषची गोष्ट म्हणजे त्यांचे सर्व फलंदाज फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन याने मागील दोन सामन्यात अर्धशतकी खेळी होती, पहिल्या सामन्यात फेल झालेल्या रोहित शर्मा ने मागील सामन्यात 42 धावा केल्या. शिवाय कर्णधार कोहलीची तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत आहे. पाचव्या स्थानावर येत केएल राहुल या संधीचा पूर्ण फायदा करून घेतला. भारताचे गोलंदाजही पूर्ण लयीत आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाला ते हल्ल्यात घेऊ शकत नाही. त्यांची सलामी जोडी-डेविड वॉर्नर आणि कर्णधार फिंचमध्ये सामना पालटवायची क्षमता आहे. शिवाय, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन यांनी मागील सामन्यात प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना नियमितपणे विकेट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकायचा असेल तर भारताला या सर्वांपासून सावध राहावे लागेल.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेयिंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, मनीष पांडे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), अॅश्टन टर्नर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड , अॅडम झांपा, अॅस्टन अगार.