IND vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) बाद करत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) रेकॉर्डब्रेक कामगिरीची नोंद काली. चहल रविवारी पुरुष टी -20 मध्ये टीम इंडियाचा संयुक्त सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज (Highest T20I Wicket-Taker for India) ठरला. 30 वर्षीय चहलने आतापर्यंतच्या सर्वात छोट्या स्वरूपात 44 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या असून त्याने जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) बरोबरी केली. यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिले स्थान मिळवले होते, परंतु आता चहल त्याच्यासह अव्वल स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या टी-20 मध्ये स्मिथला बाद करताच चहलने मैलाचा दगड गाठला. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात असून शुक्रवारी झालेल्या सलामीच्या लढतीत यजमानाने संघाचा पराभव झाल्याने आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. (IND vs AUS 2nd T20I: मॅथ्यू वेडची एकाकी झुंज, स्टिव्ह स्मिथची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियाचे टीम इंडियापुढे 195 धावांचं तगडं आव्हान)
यापूर्वी कॅनबरा येथील मानुका ओव्हल येथे चहलने दोन टी-20 मॅचमध्ये चहलने 25 धावा देत तीन विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजीने टीम इंडियाला 11 धावांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आणि अखेरीस त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. चहल कन्क्शन सब्स्टीट्युट म्हणनून कॅनबेरा सामन्यात खेळला होता. रवींद्र जडेजाला फलंदाजी करताना डोक्याला दुखापत झाली ज्यानंतर गोलंदाजीसाठी त्याच्या जागी चहलला संधी मिळाली, ज्याचा त्याने करून घेतला. भारताच्या डावातील शेवटच्या षटकात मिचेल स्टार्कचा बाऊन्सर जडेजाच्या हेल्मेटवर आदळला होता.
Yuzvendra Chahal has equalled Jasprit Bumrah's record of most wickets for India in men's T20Is 👏
They have 59 scalps each! pic.twitter.com/xTh5a0kGvA
— ICC (@ICC) December 6, 2020
दरम्यान, सिडनीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फटकेबाजीच्या 194 धावांचा डोंगर उभारला. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार आरोन फिंच खेळत नसल्याने वेडकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. वेडने 58 धावा केल्या तर माजी कर्णधार स्मिथ 46 धावा करून परतला. भारताकडून टी नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.