IND vs AUS 2nd ODI: मनीष पांडे याने डेविड वॉर्नर ला बाद करण्यासाठी पकडलेला एक हाती सुपरमॅन स्टाईल कॅच पाहून सर्वांनाच बसला धक्का, पाहा हा Video
मनीष पांडे (Photo Credit: Twitter/BCCI)

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या वनडे सामन्यात लज्जास्पद पराभूत झाल्यावर भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात दमदार खेळी केली आहे. राजकोट येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना उत्कृष्ट कामगिरी बजावली. यानंतर त्याने क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. मनीष पांडे (Manish Pandey) याने डेविड वॉर्नर (David Warner) याचा घेतलेला झेल आश्चर्यकारक म्हणता येईल. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत 6 गडी गमावून ऑस्ट्रेलियासमोर 341 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 96 धावा केल्या. केएल राहुलने 80 आणि विराट कोहलीने 78 धावा केल्या. रोहित शर्मा यानेही उपयुक्त योगदान दिले. या सामन्यात भारतीय खेळाडू मनीषने ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नरचा 'सुपरमॅन' झेल पकडून सर्वांना चकित केले.

डावाच्या चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ऑफ साइडमध्ये हवेत शॉट मारला तेव्हा कव्हर्स आणि पॉईंट दरम्यान उभे असलेल्या मनीषने हवेत उडी मारली आणि एका हाताने वॉर्नरचा अप्रतिम झेल पकडला. पांडेचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेवटच्या सामन्यात शतक झळकावणारा वॉर्नर या सामन्यात 12 चेंडूंत 15 धावा करून मोहम्मद शमी याचा शिकार बनला. पाहा हा व्हिडिओ:

पहिले बॅटिंग करत टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 340 धावा केल्या. धवन आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. दोन्ही खेळाडू आरामात फलंदाजी करीत होते आणि जोखीम घेत नव्हते. पण, 14 व्या ओव्हरमध्ये अ‍ॅडम झांपाचाय चेंडूवर रोहित एलबीडब्ल्यू आऊट झाला. रोहित बाद होण्यापूर्वी एक विक्रम करण्यात यशस्वी झाला. 7000 धावा करणारा तो वेगवान सलामी फलंदाज ठरला आहे. झांपाने पुन्हा एकदा कोहलीला आपला शिकार ठरवून त्याला शतक पूर्ण करू दिले नाही. कोहलीने 76 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने शानदार डाव खेळला. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुल शेवटपर्यंत टिकून राहिला. राहुलने 52 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने भव्य अर्धशतक झळकावले.