व्हिक्टोरिया (Victoria) राज्यात कोविड-19 (COVID-19) प्रकरणात वाढ होत असतानाही यंदा वर्षअखेरीस बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याचे ठिकाण म्हणून मेलबर्न क्रिकेट मैदान (Melbourne Cricket Ground) ठेवण्याचे आवाहन स्पिन दिग्गज शेन वॉर्नने (Shane Warne) केले. प्रशासक मंडळ या आठवड्यात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करणार असून यात चार कसोटींचा समावेश आहे आणि बॉक्सिंग डे कसोटी एमसीजीवर (MCG) आयोजित न केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वॉर्नने ट्विटरवरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अपील केली आणि लिहिले की, “फुटबॉल (खरं) मागे क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात मोठा खेळ आहे आणि ऑस्ट्रेलियन क्रीडा दिनदर्शिकेतील सर्वात मोठा दिवस म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट. यावर्षी हे एमसीजीमध्ये ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणे आणि सर्व प्रयत्न करणे आवश्यक आहे. एफवायआयआय- मेलबर्न कप आणि एएफएल जीएफ ऑगस्टमधील पुढची सर्वात मोठी स्पर्धा आहे!.” (IND vs AUS 2020-21: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणार मोठा बदल; पर्थऐवजी अॅडलेड किंवा ब्रिस्बेनमध्ये दौरा सुरू होण्याची शक्यता)
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) राज्य सरकारने त्यांच्या प्रदेशात क्वारंटाइन मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता लागू होणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर भारतीय संघाचा बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौरा डे/नाईट टेस्टने अॅडिलेड किंवा ब्रिस्बेन येथून सुरु होऊ शकतो. एमसीजी येथे पारंपरिकरित्या बॉक्सिंग डे टेस्ट (दुसरा सामना) आयोजित केला जातो, पण कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधामुळे अॅडिलेडच्या मैदानावर खेळाचे आयोजन केले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. पर्थ देखील एक पर्याय आहे.
वॉर्नचे ट्विट
Cricket is the 2nd biggest sport in the world behind soccer(fact) & the biggest day on the Aust sporting calendar is the Boxing Day test. We must try & do everything possible to keep it at the MCG this year. FYI- The Melb Cup & the AFL GF are the next biggest events in Aust !
— Shane Warne (@ShaneWarne) September 7, 2020
‘The Age’ मधील एका अहवालात म्हटले की, “कोरोना भीतीमुळेही एमसीजीला बॉक्सिंग डे कसोटीचे यजमान म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे.” सिडनी सलग दुसरी टेस्ट किंवा फक्त तिसरा सामना आयोजित करू शकतो तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाऊ शकतो. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टी-20 मालिकेसह दौऱ्याची सुरुवात होऊ शकते. टीम इंडिया पहिल्यांदा परदेशी मैदानावर डे-नाईट कसोटी खेळणार आहे. यापूर्वी, भारतीय टीमने बांग्लादेशविरुद्ध घरच्या मैदानावर (कोलकाता) पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला होता.