India vs Australia 2nd ODI 2019 (Photo Credit: IANS)

India vs Australia 2020-21 Full Schedule: विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) सज्ज होत आहेत. 27 नोव्हेंबर रोजी 3 वनडे सामन्याने टीम इंडियाचे (Team India) मिशन ऑस्ट्रेलिया सुरु होणार आहे. त्यानंतर 3 टी-20 आणि अखेर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौऱ्याचा शेवट होईल. आयपीएल 13 च्या समाप्तीनंतर टीम इंडियाचे खेळाडू युएईहून थेट ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते जिथे दोन दिवस क्वारंटाइन राहिल्यावर त्यांनी मैदानी प्रशिक्षण सुरु केले. कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे मिळालेल्या तब्बल आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर भारतीय संघ (Indian Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्यांनतर टी-20 मालिका आणि अखेरीस आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळली जाईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना दिवस/रात्र सामना असेल, जो अ‍ॅडिलेड (Adelaide) येथे खेळला जाईल. आज आपण जाणून घेणार आहोत भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळ, स्थळासह संपूर्ण वेळापत्रक: (IND vs AUS Series: भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणार मजेदार द्वंद्व; जाणून घ्या 2018-19 दौऱ्यावरील टेस्ट मालिकेची 'ही' आकडेवारी)

भारताच्या मागील, 2018-19 दौऱ्यावर टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. अशास्थितीत भारतीय संघाचा अथविश्वास उंचावला असेल आणि मागील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी आतुर असतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या सामन्यांचे वेळ आणि ठिकाण:

मॅच तारीख स्थळ वेळ (भारतीय वेळेनुसार)
पहिली वनडे 27 नोव्हेंबर सिडनी 9.10 (सकाळ)
दुसरी वनडे 29 नोव्हेंबर सिडनी 9.10 (सकाळ)
तिसरी वनडे 2 डिसेंबर कॅनबेरा 9.10 (सकाळ)
पहला टी-20 4 डिसेंबर कॅनबेरा 1.40 (दुपार)
दुसरा टी-20 6 डिसेंबर सिडनी 1.40 (दुपार)
तिसरा टी-20 8 डिसेंबर सिडनी 1.40 (दुपार)
पहला टेस्ट 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर अ‍ॅडिलेड 9.30 (सकाळ)
दुसरा टेस्ट 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर मेलबर्न 5.00 (सकाळ)
तिसरा टेस्ट 07 जानेवारी ते 11 जानेवारी सिडनी 5.00  (सकाळ)
चौथा टेस्ट 15 जानेवारी ते 19 जानेवारी ब्रिस्बेन 5.00 (सकाळ)