IND vs AUS 2020-21 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) पोहचला असून सरावाला सुरुवात केली आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) नव्याने तयार झाला असून तो यजमान संघाशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. ही मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या दिवशी दोन्ही वनडे सामना खेळेल. वनडे मालिकेनंतर टी-20 मालिका खेळली जाईल. यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) अंतर्गत कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून खेळला जाईल जो डे नाईट असेल. पहिल्या कसोटीनंतर कोहली मायदेशी परतणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. यावेळी भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलियाची टीम दुसर्या क्रमांकावर आहे. (IND vs AUS 2020-21 Full Schedule: वनडे मालिकेने सुरु होणार टीम इंडियाचे Mission Australia; जाणून घ्या वेळ, स्थळांसह संपूर्ण वेळापत्रक)
मार्च महिन्यानंतर भारतीय संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे, टी-20 आणि टेस्ट मॅचशी संबंधित सर्व अपडेट इथे जाणून घ्या. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने सिडनी, कॅनबेरा, अॅडिलेड आणि मेलबर्न येथे खेळले जातील. भारतीय प्रेक्षकांना एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील. शिवाय, आपल्याला Sony LIV अॅपवर सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळेल.
भारताच्या मागील, 2018-19 दौऱ्यावर टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. अशास्थितीत भारतीय संघाचा अथविश्वास उंचावला असेल आणि मागील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी आतुर असतील. दुसरीकडे, डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचा संघात समावेश झाल्याने ऑस्ट्रेलिया संघ देखील मजबूत दिसत आहेत. दोन्ही संघात पहिल्यांदा दिवस/रात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आजवर गुलाबी चेंडूने खेळलेला एकही सामना गमावलेला नाही, तर यंदा कोणत्या संघाला पहिला पराभव पत्करावा लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.