Video: दिव्यांश सक्सेना ने पाकिस्तान अंडर-19 विरुद्ध पकडला जबरदस्त कॅच, विराट कोहली च्या स्टाईलमध्ये सेलिब्रेट करत सर्वांना केले चकित
दिव्यांश सक्सेना (Photo Credit: Twitter)

आयसीसी अंडर-19 विश्वचषक (World Cup) सेमीफायनल सामना भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळला जात आहे. या उच्च व्होल्टेज सामन्यात बरेच रोमांचक क्षण पाहायला मिळाले. अंडर-19 विश्वचषकचे फायनल गाठण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहे. आजच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी केली आणि पाकिस्तानला फक्त 172 धावांवर ऑलआऊट केले. एकेवेळी पाकिस्तान संघ 240 धावांच्या जवळ वाटत असताना गोलंदाजांनी जोरदार खेळ दाखवून पाक संघाला रोखले. गोलंदाजांशिवाय क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी बजावली. या सामन्यात दिव्यंश सक्सेनाचा (Divyaansh Saxena) अप्रतिम झेल पकडला जो सध्या चर्चेत आला आहे. दिव्यांशने पाकिस्तानचा धोकादायक फलंदाज मोहम्मद हॅरिसचा (Mohammad Haris) झेल पकडला आणि कॅच पकडुन दिव्यांशने सिनिअर टीमचा कर्णधार विराट कोहली याच्या 'सायलेन्स सेलिब्रेशन'च्या शैलीत विकेट साजरी केली. कोहली अनेक झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांसमोर तोंडावर बोट ठेवून सेलिब्रेशन करताना दिसला आहे. (IND vs PAK U19 World Cup 2020: भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी, पाकिस्तान 172 धावांवर ऑलआऊट)

पाकिस्तानी डावाच्या 35 व्या ओव्हरमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर याच्या चेंडूवर हॅरिसने स्वीप शॉट खेळला. हॅरिसच्या स्वीप शॉटवर दिव्यांशने डीप स्क्वेअर लेगपर्यंत धाव घेतली आणि झेप घेत झेलबाद झेल घेतला. दिव्यांशचा हा झेल खूप जबरदस्त होता, ज्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. दिव्यांशच्या या झेलमुळे हा सामना पुन्हा एकदा भारताच्या बाजूने लागला. या झेलनंतर दिव्यंशने कोहलीच्या स्टाईलमध्ये विकेट साजरी करून प्रेक्षकांसमोर तोंडावर बोट ठेवले. हॅरिस क्रीजवर टिकून चांगले शॉट खेळत होता. त्याने 14 चेंडूत 21 धावा केल्या आणि काउंटर अटॅक करून भारतीय संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आजच्या या पहिल्या सेमीफायनल सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना मोठा स्कोर करू दिला आणि 172 धावांवर ऑलआऊट केले. टीम इंडियाला आता अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठण्यासाठी 173 धावांची गरज आहे.