विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

ICC WTC Final 2021: बांग्लादेशविरुद्ध 2019 कसोटी सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत आहे. अशास्थितीत तज्ञ आणि चाहत्यांना न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (World Test Championship) फायनल सामन्यात त्याच्याकडून जबर खेळाची अपेक्षा आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 चा अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघात खेळला जात आहे. सध्या भारतीय कर्णधार विराट 18 आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 4 धावा करून खेळत आहेत. किवी कर्णधार केन केन विल्यमसनने टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले आणि गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला ठरवत चार भारतीय फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. टेस्ट एक्स्पर्ट चेतेश्वर पुजारा देखील स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे आता संघाला विराट आणि रहाणेच्या जोडीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. (ICC WTC Final 2021: विराट कोहलीने का नाही केले प्लेइंग XI मध्ये बदल? टीम इंडिया कॅप्टनने सांगितले मोठे कारण)

कर्णधार विराट कोहलीची बॅट डब्ल्यूटीसी फायनल सामन्यात तळपली तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो एक-दोन नव्हे तर सहा दिग्गज खेळाडूंना मागे टाकेल. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या कोहलीच्या नावावर 7496 धावा आहेत. तसेच या सामन्यात जर त्याने 63 धावा केल्या तर तो सध्याचा कीवी फलंदाज रॉस टेलर (7506), माजी कॅरिबियन क्लाइव्ह लॉयड (7515), ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मार्क टेलर (7525), पाकिस्तानचे माजी खेळाडू मोहम्मद युसुफ (7530), विद्यमान ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ (7540) आणि वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर गॉर्डन ग्रीनिज (7558) यांना मागे टाकेल. दरम्यान, कोहलीच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे तर त्याने देशाकडून 92 कसोटी सामन्याच्या 154 डावांमध्ये 52.41 च्या सरासरीने 7496 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 27 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

दुसरीकडे, WTC फायनल सामन्यात कोहलीकडून मोठ्या शतकी खेळी देखील अपेक्षित आहे. साउथॅम्प्टनच्या विजेतेपदाच्या निर्णायक सामन्यात शतक करताच विराट माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. पॉन्टिंगनंतर विराटच्या गद्दारवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा रेकॉर्ड असेल.